बाळासाहेबांवरील ठाकरे सिनेमातील भूमिका खूपच टफ:सिद्दीकी

0
1059

गोवाखबर:शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आयुष्यावर बनत असलेल्या ठाकरे सिनेमातील बाळासाहेबांची भूमिका साकारणे खुप कठिण आहे.हा सिनेमा मराठी आणि हिंदी मध्ये बनवला जात आहे.मराठी माझ्यासाठी नवीन भाषा असल्याने त्यासाठी खास शिकवणी वर्ग लावले आहे.बाळासाहेबांच्या बोलण्याच्या लकबीवर खूपच मेहनत घ्यावी लागत असल्याची माहिती बॉलीवुड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दकी याने आज दिली.
बांबोळी येथील ग्रैंड हयात हॉटेल मध्ये आयोजित गोवाफेस्ट मध्ये आयोजिय नॉलेज सेमिनारमध्ये अन्नू कपूर यांच्याशी संवाद साधताना सिद्दीकी यांनी ही माहिती दिली. सिद्दीकी म्हणाले,सध्या ठाकरे या सिनेमाचे शूटिंग सुरु आहे.येथून गेल्या नंतर पुन्हा त्याच शूटिंग करणार आहे.आयुष्यात इतक्या भूमिका केल्या पण बाळासाहेबांची भूमिका सगळ्यात टफ आहे अशी कबूली सिद्दकी यांनी दिली. बाळासाहेब बोलताना कोटया करत.त्यांची बोलण्याची फेक वेगळी होती.ती आत्मसात करून भूमिका साकारण्यासाठी खूपच मेहनत घ्यावी लागत असल्याचे सिद्दिकी म्हणाले.
अन्नू कपूर यांनी सिद्दीकी यांची मुलाखत घेतली.सिद्दीकी यांनी छोट्याशा गावातून बडोदा, दिल्ली आणि मुंबई दरम्यान आयुष्यात घड़लेल्या घटना उपस्थितां समोर उलगडून सांगितल्या.मुंबई मध्ये रहायचे झालेले वांदे,दिल्लीत खर्च भागवण्यासाठी केलेली सिक्युरिटी गार्डची नोकरी ते बॉलीवुड मधील एंट्री पर्यंतचा प्रवासा सिद्दीकी यांनी उलगडून सांगितला.
पडड्यावरच्या भूमिका साकारण्यात वेगळे समाधान मिळते. रियल लाइफ मध्ये तडजोड करण्यासाठी बरेच खोट बोलाव लागत पण रील लाइफ मध्ये सत्य बोलून दाखवता येत असेही सांगत रील लाइफ रियल लाइफ पेक्षा जास्त जवळचे वाटते असे सिद्दीकी म्हणाले.