बालपणीचा मित्र हरपल्याने दुःखी:मुख्यमंत्री

0
1281
गोवा खबर:माजी उपमुख्यमंत्री तथा म्हापशाचे भाजपचे आमदार फ्रान्सिस डिसोझा यांच्या निधना बद्दल मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांनी ट्वीट करून दुःख व्यक्त केले आहे.

मुख्यमंत्र्यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे,माझा बालपणीचा मित्र,माझा सहकारी आणि माजी उपमुख्यमंत्री फ्रान्सिस डिसोझाच्या निधनाचे वृत्त ऐकून मला अतीव दुःख झाले आहे.डिसोझा हे चांगले गृहस्थ तसेच नेते होते ज्यांना सगळ्यांचे प्रेम लाभले होते.त्यांनी आपले आयुष्य समाज सेवेसाठी समर्पित केले होते.त्यांच्या निधनाने आमचे मोठे नुकसान झाले आहे.त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आपण सहभागी असून या कठीण प्रसंगातून बाहेर येण्याची शक्ती त्यांना मिळो,अशी प्रार्थना करतो.
दरम्यान, डिसोझा यांच्या निधनाबद्दल राज्यात ३ दिवस दुखवटा, सरकारी कार्यालये, स्थानिक-स्वायत्त संस्था, सार्वजनिक आस्थापने, शैक्षणिक संस्था १५ फेब्रुवारी रोजी  बंद राहणार असून सर्व सरकारी कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत.