बार्सिलोनात दहशतवादी हल्ला, १३ जणांचा मृत्यू?

0
1039

स्पेनमधील बार्सिलोना शहरातील गजबजलेल्या लास रामब्लास भागात एका व्हॅननं गर्दीत घुसून अनेकांना चिरडलं आहे. हा दहशतवादी हल्ला असल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला असून त्यात १३ जणांचा मृत्यू झाल्याचं वृत्त स्थानिक रेडिओनं दिलं आहे. जखमींची संख्याही मोठी असल्याचं कळतं.

लास रामब्लास या भागात खरेदीसाठी स्थानिकांची आणि पर्यटकांचीही सतत गर्दी असते. इथे अनेक दुकानं आणि कॅफेटेरिया आहेत. याच परिसरात भरधाव वेगात आलेल्या एका व्हॅननं पादचाऱ्यांना चिरडलं आणि एकच खळबळ उडाली. घटनेनंतर काही मिनिटांतच पोलीस आणि प्रशासन घटनास्थळी पोहोचलं. मदत आणि बचावकार्याचे फोटो, व्हिडिओ प्रत्यक्षदर्शी ट्विट करत आहेत. त्यातून घटनेची भीषणता सहज लक्षात येते.

बीअर बारमध्ये मद्यपान केल्यानंतर दोघा सशस्त्र हल्‍लेखोरांनी कारच्या माध्यमातून नागरिकांना चिरडल्याची माहिती सूत्रांनी दिली. हल्ल्यानंतर हल्‍लेखोर घटनास्थळाहून पसार झाले असून पोलिसांनी शोधमोहीम जारी ठेवली आहे. हल्ल्यानंतर घटनास्थळी मदत व बचाव पथक दाखल झाले. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. कारच्या धडकेत अनेकजण जखमी झाले. स्पॅनिश पोलिसांनी एका ट्विटच्या माध्यमातून या घटनेची माहिती दिली. स्पेनच्या सरकारी वृत्तसंस्थेने या घटनेचा एक फोटो प्रसिद्ध केला. बार्सिलोनातील लास रॅमब्लासमध्ये एका पांढर्‍या कारने पदपथावरून चालणार्‍या काही जणांना चिरडले. हा दहशतवादी हल्‍ला असल्याची माहिती पोलिसांनी दिली. ही घटना भयावह असल्याचे पोलिसांनी ट्विटरवर म्हटले आहे. यानंतर शहरातील आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेने लास रॅमब्लासमधील प्लाका काटालुनिया भागात न जाण्याच्या सूचना नागरिकांना दिल्या आहेत. याशिवाय जवळचे मेट्रो आणि रेल्वे स्थानक बंद करण्याच्या सूचनादेखील करण्यात आल्या. कारने पदपथावरील लोकांना चिरडल्यानंतर त्यामधून बाहेर पडलेले दोघे जण त्याच भागातील एका हॉटेलमध्ये शिरले. या हल्ल्याची जबाबदारी इसीस या दहशतवादी संघटनेने घेतली आहे.