बाबांनी मला विश्वास शिकवला ;गोवा ,राजकारण आणि पर्रिकर प्रकाशनाप्रसंगी उत्पलचे भावोदगार

0
995
गोवा खबर: माझ्या वडिलांनी मला राजकारणात सहकारी पक्ष व सहकारी राजकारण्यावर विश्वास ठेवण्यास शिकवले पण कधी कधी आपण ठेवत असलेला विश्वास हा बेक-फायरही होतो, अशी भावना स्व. मनोहर पर्रीकर यांचे पुत्र उत्पल पर्रीकर यांनी व्यक्त केली.

पत्रकार सदगुरु पाटील यांनी मनोहर पर्रीकर यांच्यावर लिहिलेल्या गोवा ,राजकारण आणि पर्रिकर या पुस्तकाचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी प्रकाशन केले. उत्पल, अतिरिक्त साॅलिसिटर जनरल आत्माराम नाडकर्णी, ज्येष्ठ लेखक विश्राम गुप्ते, सहित प्रकाशनचे किशोर अर्जुन व्यासपीठावर होते.

मुख्यमंत्री सावंत यांनी आपण पर्रीकर यांच्यामुलेच इथपर्यंत पोहचलो असे नमूद केले. आत्माराम नाडकर्णी यांनी पाटिल यांचे पुस्तक लवकर इंग्रजीत अनुवादित होऊन यावे अशी अपेक्षा व्यक्त केली.
विश्राम गुप्ते यांनी पुस्तकात पर्रीकर यांचा स्वभाव तसेच बरेच किस्से वाचनीय आहेत असे सांगितले.
किशोर नाईक गावकर यांनी सुत्रनिवेदन केले. किशोर अर्जुन यांनी स्वागत व प्रास्ताविक केले