बाणावली पाण्याच्या समस्येपासून मुक्त होईपर्यंत विश्रांती घेणार नाही : कॅप्टन वेन्झी व्हिएगस

0
116
गोवा खबर : बाणावली मतदारसंघातील सेरनाभाटीमधील अंबेक्सिर येथील रहिवासी काल जवळजवळ एक वर्षापासून त्रस्त असलेल्या अनियमित पाणीपुरवठ्याच्या निषेधार्थ मोठ्या संख्येने जमा झाले ज्यांना पाण्याच्या अत्यंत कमी दाबामुळे पाण्याची एक बादली भरण्यासही तास लागतो.
आम आदमी पार्टीच्या कॅप्टन वेन्झी व्हिएगास यांना ३० घरातील ग्रामस्थांनी “उदकाची सुटका” या बॅनरखाली बोलवलेल्या कार्यक्रमामध्ये आमंत्रित केले, यावेळी लोकांनी जीवनाचे अमृत असलेले पाणी प्राप्त करण्यात होत असलेला त्रास व पीडा व्यक्त केली.
आजूबाजूच्या भागातील हॉटेल्सला आवश्यक तेवढे पाणी मिळते परंतु घरगुती ग्राहकांना पाणी मिळत नाही आणि काही वेळेस पाण्यासाठी रात्रभर जागे राहावे लागत आहे, अशी व्यथा ग्रामस्थांनी व्यक्त केली व स्थानिक आमदार चर्चिल अलेमाओ यांनासुद्धा या समस्येबद्दल सांगितले जात असूनही त्यांना आमच्या क्षेत्राला भेट देण्यासाठी वेळ नाही, याबद्दल नागरिकांनी खेद व्यक्त केला.
बाणावली मतदारसंघाला पाण्याची समस्या नाही आणि पाणीपुरवठ्याची तक्रार नोंदवणारे वेरोडे व व्होडले भाट येथील रहिवासी खोटे बोलत आहेत या स्थानिक आमदाराच्या आरोपाचा, गावकऱ्यांनी निषेध केला.
बाणावली मधील पाणीपुरवठ्याचा प्रश्न उपस्थित केल्याबद्दल ग्रामस्थांनी आपचे आभार मानले आणि ते म्हणाले की, आपने बाणावली गावातल्या लोकांचा प्रश्न लक्षात घेतला यासाठी त्यांनी त्यांच्या तक्रारी ऐकण्यासाठी पक्षाला आमंत्रित केले आहे आणि ज्यांना पाण्याची समस्या आहे त्यांना याविरोधात उभे राहण्याचे आवाहन केले. याबद्दल  कॅप्टन व्हीएगास यांनी संपूर्ण बाणावली मतदार संघातील लोकांना घाबरू नका आणि या विषयावरुन आंदोलन उभे करुयात असे आवाहन केले जेणेकरुन बाणावली पाण्याच्या समस्येपासून मुक्त होईल.
आम्ही सातत्याने पाणीपुरवठा करण्यासाठी पैसे देत आहोत परंतु आम्हाला ते मिळत नाही,”म्हणून सरकारने त्यांना सेवेअभावी नुकसान भरपाई द्यावी आणि पाणी शुल्कासाठी त्यांनी गेल्या एका वर्षात भरलेल्या शुल्का पैकी कमीतकमी ५० टक्के रक्कम परत करावी, असे जमलेल्या गावकऱ्यांपैकी एकाने मागणी केली.
त्यानंतर ग्रामस्थांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनावर स्वाक्षरी केली, ज्यांनी कबूल केले की तांत्रिक समस्यांमुळे ग्रामस्थांना योग्य प्रमाणात पाणीपुरवठा होत नाही, परंतु तांत्रिक समस्या जवळपास एक वर्ष का सुटली नाही याचे उत्तर ते देऊ शकले नाही.