बाणस्तारी पूल वाहतूकीस बंद

0
179

गोवा खबर : राष्ट्रीय महामार्ग-४ अ वरील बाणस्तारी पूल २५ ऑक्टोबर रोजी सकाळी ६.३० ते ८.३० वाजेपर्यंत सर्व प्रकारच्या वाहतूकीसाठी बंद राहील. या काळात पूलाची पाहणी आणि डेक लेव्हल्सचे रिकॉर्डिंगचे काम हाती घेण्यात येणार आहे, असे माहिती खात्यातर्फे कळविण्यात आले आहे.

जुवारी पूल बंद काळात फेरीबोटींची सोय

१८ ऑक्टोबर रोजी जुवारी पूल बंद असल्याने आगशी-कुठ्ठाळी जलमार्गांवर सकाळी ६ ते रात्री ९ वाजेपर्यंत एकूण चार फेरीबोटींची सोय करण्यात आली आहे. ही फेरी सेवा प्रवासी तसेच दुचाक्यांसाठीच उपलब्ध करण्यात आली आहे. चारचाकी आणि तीन चाकी व इतर हलक्या व अवजड वाहनाना या फेरीबोटींमध्ये परवानगी नसेल. फेरी बोटींच्या सुरळीत वाहतूकीसाठी लोकांनी सहकार्य द्यावे अशी विनंती करण्यात येते, असे माहिती खात्यातर्फे कळविण्यात आले आहे.