बाणशेच्या जंगलात कुडतरीच्या महिलेचा खुन?

0
1446
गोवा खबर:दक्षिण गोव्यातील तिमा वाडो (रिवण) येथील बाणशे येथे जंगलात निर्जनस्थळी वेलनसिया फर्नांडिस या तिशीतील महिलेचा मृतदेह आढळून आला आहे.तिचा खुन झाला असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
 पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, सदर महिला मायणा कुडतरी येथील रहिवाशी आहे. 
गुरुवारी रात्री उशिरा हा प्रकार घडला असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. महिलेच्या शरीरावर नेव्ही ब्लू रंगाची जीन्स पॅन्ट आणि जॅकेट आढळून आले आहे. गळा दाबून हा खून केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.
सदर युवती मडगावमधील एका वैद्यकीय आस्थापनात कामाला होती.  गुरुवारपासून ती आपल्या घरी परतली नव्हती. त्यामुळे तिच्या कुटुंबियांनी मायणा कुडतरी पोलिस स्थानकात ती बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली होती. पोलिस निरीक्षक रॉय परेरा, रवी देसाई , महाजीक आणि सुदेश नार्वेकर घटनास्थळी दाखल झाले असून तपास कार्य सुरु करण्यात आले आहे.