रासायनिक प्रक्रिया करून फळे विकणाऱ्यांवर एफडीएची कारवाई
गोवा खबर:बाजारात मिळणारी पिकलेली फळे खावून आरोग्य सुधारेल अशी आशा बाळगून असाल तर सावधान.बऱ्याच रासायनिक प्रक्रिया करून पिकवलेली फळे बाजारात आणून विकली जातात.अन्न आणि अौषध प्रशासनाने म्हापसा आणि पणजीत टाकलेल्या धाडी नंतर ही बाब उघडकीस आली आहे.
पणजी:रासायनिक प्रक्रिया करून फळे पिकवून बाजारात विकणाऱ्या दुकानदारांवर अन्न आणि अौषध प्रशासनाने कडक कारवाई सुरु केली आहे.काल म्हापशात आणि आज पणजी मार्केट मध्ये धाड टाकून रासायनिक प्रक्रिया केलेली फळे जप्त करून ती नष्ट करण्यात आली. pic.twitter.com/P4yuNBGpV0
— Dev walavalkar (@walavalkar) February 29, 2020
रासायनिक प्रक्रिया करून फळे पिकवून बाजारात विकणाऱ्या दुकानदारांवर अन्न आणि अौषध प्रशासनाने कडक कारवाई सुरु केली आहे.काल म्हापशात आणि आज पणजी मार्केट मध्ये धाड टाकून रासायनिक प्रक्रिया केलेली फळे जप्त करून ती नष्ट करण्यात आली.
अन्न आणि औषध प्रशासनाने आज पणजी मनपाचे महापौर उदय मडकईकर आणि मनपाच्या बाजार निरीक्षकांच्या उपस्थितीत पणजी मार्केट मधील फळ विक्रेत्यांची अचानक तपासणी करून खराब झालेली आणि रासायनिक प्रक्रिया करून पिकवलेली फळे जप्त करून ती नष्ट केली. काही ठिकाणची सँपल देखील घेण्यात आली आहेत.
गोवा खबर:अन्न आणि औषध प्रशासनाने आज पणजी मनपाचे महापौर उदय मडकईकर आणि मनपा बाजार निरीक्षकांच्या उपस्थितीत आज पणजी मार्केट मधील फळ विक्रेत्यांची अचानक तपासणी करून खराब झालेली आणि रासायनिक प्रक्रिया करून पिकवलेली फळे जप्त करून ती नष्ट केली.या कारवाई नंतर महापौर उदय मडकईकर म्हणाले. pic.twitter.com/Cdmb1PjgLZ
— Dev walavalkar (@walavalkar) February 29, 2020
आज सकाळी 6 वाजल्या पासून ही कारवाई करण्यात आली.रासायनिक प्रक्रिया करून फळे विकणाऱ्यांवर आणि प्लास्टिक पिशव्या ठेवणाऱ्या विक्रेत्यांवर कारवाई करण्यात आली.
म्हापशात काल रासायनिक प्रक्रिया करून पिकवलेली केळी जप्त करून नष्ट करण्यात आली होती.






अन्न आणि अौषध प्रशासनाच्या या धडक कारवाईचे स्वागत होत आहे.ग्राहकांच्या आरोग्याशी खेळून फळे विकणाऱ्यांचे यामुळे धाबे दणाणले आहेत. अशीच तपासणी मधून मधून करून ग्राहकांना चांगली फळे मिळतील याची खबरदारी घ्यावी,अशी मागणी केली जात आहे.
