बागा येथे अल्पवयीन मुलीचा विनयभंग ; पुण्याचे 9 पर्यटक अटकेत

0
1033
गोवा खबर:जीवाचा गोवा करण्यासाठी येणारे काही पर्यटक करत असलेल्या असभ्य आणि गुन्हेगारी स्वरूपाच्या कृत्यांमुळे गोवा पर्यटन क्षेत्रात बदनाम होऊ लागला आहे.बेताळभाटी येथील गँगरेपची घटना ताजी असतानाच आज काल बागा येथे घड़लेली घटना उघड़ झाल्यामुळे स्थानिकांमधून चीड व्यक्त केली जात आहे.
लहान मुलाला मारहाण  आणि त्याच्या अल्पवयीन बहिणीचा विनयभंग करणाऱ्या पुण्याच्या ९ पर्यटकांना कळंगुट पोलिसांनी अटक केली आहे. हे सगळेजण पुणे-महाराष्ट्र येथील असल्याचं आहेत.
ही घटना २९ मे रोजीची बागा बीचवर घडली. तक्रारदाराने पोलीस स्टेशनमध्ये नोंदवलेल्या तक्रारीत दिलेल्या माहितीनुसार ते बागा बीचवर असलेल्या शॅकमध्ये बसले होते. त्यांचा मुलगा आणि मुलगी बीचवर फेरफटका मारत होते. यावेळी ११ जणांचा एक गट आला आणि त्यांनी मुलीचे फोटो काढायला सुरूवात केली. तिच्या भावाने याला आक्षेप घेतला असता या टोळक्याने त्याला मारहाण केली.
तक्रारदाराने तक्रार नोंदवल्यानंतर हे आरोपी पळून जाण्याची शक्यता होती मात्र पोलिसांनी या आरोपींना त्याआधीच अटक केली. यातील दोन आरोपी अल्पवयीन असून त्यांना ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांनी त्यांची रवानगी मरेशी बालसुधागृहात केली आहे. कळंगुट पोलिसांनी पुण्याच्या त्या युवकांकडून अल्पवयिन मुलीचे फोटो काढण्यासाठी वापरलेला मोबाइल जप्त करून फॉरेंसिक तपासणीसाठी पाठवला आहे.या प्रकरणी अधिक तपास पोलिस निरीक्षक जीवबा दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरिक्षक महेश नाईक करत आहेत.
रमेश कांबळे,संकेत भडाळे,कृष्णा पाटील,सत्यम लांबे,अनिकेत गुरव,ह्रषिकेश गुरव,आकाश सुवसकर,सन्नी मोरे,ईश्वर पांगारे अशी आरोपींची नावे आहेत.