बागा मधील रेस्टॉरन्टवर धाड टाकून मद्य जप्त; कळंगुट पोलिस आणि अबकारी खात्याची संयुक्त कारवाई

0
941
गोवाखबर:कळंगुट पोलिसांनी काल रात्री उशिरा बागा येथील पॉज लाउंज वर म्हापसा येथील अबकारी खात्याच्या सोबत धाड टाकून  मद्य साठा जप्त केला.
बागा येथील पॉज रेस्टॉरन्ट मध्ये रात्रीच्या वेळेस मोठ्याने संगीत वाजवले जाते आणि 11 वाजल्या नंतर देखील ग्राहकांना मद्य पुरवले जात असल्याच्या आलेल्या अनेक तक्ररीची दखल घेऊन कळंगुटचे पोलिस निरीक्षक जीवबा दळवी यांनी काल रात्री उशिरा अबकारी खात्याचे निरीक्षक महेश कोरगावर आणि त्यांच्या सहकाऱ्यांसह  पॉज रेस्टॉरन्ट वर धाड टाकली असता तेथे निर्धारित वेळे नंतर देखील मद्य विक्री सुरु असल्याचे आढळून आले.अबकारी खात्याने त्याची गंभीर दखल घेऊन तेथील मद्य साठा जप्त केला. तसेच पुढील निर्देश येई पर्यंत पॉजला बार बंद ठेवण्याचे निर्देश दिले आहेत.