बागात 1 लाख 35 हजारच्या ड्रग्ससह नायजेरीयनास अटक

0
993
 गोवा:बागा येथील टिटो लेन जवळ ड्रग्स विकण्यासाठी आलेल्या नायजेरियनास कळंगुट पोलिसांनी अटक करून त्याच्या कडील 1 लाख 35 हजार रूपयांचे ड्रग्स जप्त केले आहे.
पोलिस निरीक्षक जीवबा दळवी यांनी दिलेल्या माहिती नुसार ही कारवाई काल मध्यरात्री करण्यात आली.फिलिप गॉडवीन हा नायजेरियन नागरिक ड्रग्स घेऊन बागा येथील टिटो लेन जवळ येणार असल्याची पक्की खबर पोलिसांना मिळाली होती.त्यानुसार पोलिस निरीक्षक दळवी यांच्या नेतृत्वाखाली एक टीम तयार करून सापळा रचण्यात आला.फिलिप जेव्हा टिटो लेन जवळ ग्राहकाला ड्रग्स विकण्यासाठी आला त्यावेळी पोलिसांनी झड़प घालून त्याला जेरबंद केल.त्याच्या कडून 27 हजार रूपयांचा गांजा,63 हजार रूपयांचे कोकेन आणि 45 हजार रूपयांचे एमडीएमए हे ड्रग्स जप्त करण्यात आले.फिलिप विरोधात ड्रग्स विरोधी कायद्यानुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
कळंगुट पोलिसांनी केलेल्या कारवाईत पोलिस उपनिरीक्षक कीर्तीदास गावडे, पोलिस कॉन्स्टेबल दिनेश मोरजकर,गोविंद शिरोडकर आणि वल्लभ पेडणेकर सहभागी झाले होते.पुढील तपास पोलिस निरीक्षक गावडे पोलिस निरीक्षक जीवबा दळवी,उपविभागीय पोलिस अधीक्षक किरण पौड़वाल आणि उत्तर गोवा पोलिस अधीक्षक चंदन चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली करत आहेत.