बहुजन समाजाने भाजपच्या कूटनीतीपासून सावध रहावे : जनार्दन भंडारी

0
221
गोवा खबर : बहुजन समाजाच्या लोकांनी आणि नेत्यांनी भाजपच्या कूटनीतीपासून सावध रहावे आणि आपला आवाज बुलंद ठेवावा असे आवाहन गोवा प्रदेश कॉंग्रेस समितीचे सरचिटणीस जनार्दन भंडारी यांनी केले आहे.
“आम्ही इतर पक्षांच्या आंतरिम भांडणा विषयी आणि व्यवहारा विषयी कधी काही बोललो नाही, कारण आम्हाला त्याचा अधिकार नव्हता. मात्र भाजपचे खासदार विनय तेंडुलकर व उर्फान मुल्ला यांनी आमचे नेते दिगंबर कामत व प्रतिमा कुतिन्हो यांच्याबद्दल वक्तव्य करुन  आम्हाला हा अधिकार दिला आहे.” असे भंडारी म्हणाले.
जनार्धन भंडारी म्हणाले की सत्ता मिळवण्यासाठी भारतीय जनता पार्टीने बहुजनांचा कसा वापर केला आणि एकदा सत्ता मिळाली की त्यांना बाजुला कसे काढले याचे उत्तम उदाहरण दत्तप्रसाद नाईक यांना प्रवक्ता पदावरून काढल्याने दिसत आहे.
“आपला आवाज दाबून टाकण्याचा प्रयत्न करणाऱ्या विरोधात उठयला शिकले पाहिजे, हे दत्तप्रसाद नाईक यांनी दाखवून दिले आहे.” असे ते पुढे म्हणाले.
“मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे बहुजनांचे नेते असले तरी, त्यांना स्वता ह्या पक्षात किती मान आहे हे त्यांच्या कार्य पद्धतीवरुन दिसत आहे. ते जरी गोव्याचे मुख्यमंत्री असले तरीही, भाजपात सुपर मुख्यमंत्री आहे तोच सर्व राजकारण चालवतो ह्याची जाणीव गोमंतकीय जनतेला आहे. हा सुपर मुख्यमंत्री कोण आहे आणि त्याची कारस्थानेही लोकांना माहिती आहे.” असा आरोप त्यांनी केला.
माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर, माजी मंत्री दयानंद मांद्रेकर, माजी मंत्री महादेव नाईक, माजी मंत्री राजेंद्र आर्लेकर, माजी सभापती विश्वास सतरकर, सावर्डेचे माजी आमदार गणेश गावकर, किरण कांदोळकर यांना पराभूत कोणी केले हे सांगायची काही आवश्यकता नाही. ह्या नेत्यांना भाजपचे राजकारण माहित आहे आणि ह्याचीही जाणीव आहे की  पक्षाने अन्याय केल्यावर त्याच्या विरोधात बोललो  तर हकालपट्टी कशी होते आणि कुठल्या तपास संस्थांचा वापर करुन त्यांच्यावर दबाव टाकला जातो. ह्याच कारणामुळे काही नेते मौन बाळगतात, तर दत्तप्रसाद नाईक सारखे नेते आपल्या विचारांना वाट करुन देताना दिसतात, असे त्यांनी निदर्शनास आणून दिले.
फक्त सत्ता प्रिय असलेल्या भाजपने आजपर्यंत बहुजन समाजाचा वापर मतांसाठी केला आहे. हे आतां बहुजन समाजाला हळूहळू कळायला लागले आहे आणि नेते बोलायलाही लागले आहे  असे जनार्धन भंडारी म्हणाले.
” बहुजन समाजाचे नेते एकत्र येण्याचे चित्रही ते बघू शकत नाही, आणि यासाठी समाजामध्ये फूट घालण्याचा प्रयत्न भाजप सतत करत असतो. बहुजन समजाच्या दोन दोन समित्या करुन समाज बांधवानाकशी भांडणे  करायला  लवाली हे उघड़ आहे.” असे भंडारी यांनी म्हटले.
“ह्याच दत्तप्रसाद नाईकचा वापर भाजपने आमच्या पक्षाच्या  नेत्यांविरोधात कसा केला त्याला इतिहास गवाह आहे. प्रमोद सावंत यांची सुद्धा परिस्थिती सुद्धा लक्ष्मीकांत पार्सेकर यांच्या सारखी होइल हे सध्याच्या भाजपाच्या राजकारणावरुन दिसत आहे.” असे ते म्हणाले.
भाजपने राजकीय फायद्यासाठी बहुजनांचा वापर करणे सोडावे असे त्यांनी म्हटले आहे.