बसला धडक देऊन पेट घेतलेल्या कारचालकाचा मृत्यू

0
888

गोवाखबर:सर्वण- डिचोली येथे काल सायंकाळी  कार आणि कदंब बस यांची जोरदार धडक झाली. या अपघातामध्ये कारने पेट घेतल्यामुळे गंभीर जखमी झालेल्या अभिजीत सिंदुरे  या  कारचालकाचा गोमेकॉत  मृत्यू झाला.

साखळीहून डिचोलीकडे येणारी कदंब बस सर्वण येथे आली असता समोरून     येणार्‍या कारशी बसची धडक बसली. ही धडक जबरदस्त होती कि कार बाजूला फेकली गेली व स्फोट होऊन कारने पेट घेतला. यावेळी कारचालक अभिजीत सिंधुरे याला तातडीने कारमधून येथील लोकांनी बाहेर काढले. त्याला गंभीर स्थितीत प्रारंभी डिचोली इस्पितळात नंतर तेथून गोमेकॉ इस्पितळात उपचारासाठी नेण्यात आले.

अपघाताची माहिती मिळताच अग्‍निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली, मात्र कार पूर्ण जळून गेली होती.