बनावट ट्विट स्क्रीनशॉटसंबंधी मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाकडून खुलासा

0
491
गोवा खबर : करोना व्हायरसचा प्रसार टाळण्यासाठी शिक्षण खात्याने सर्व शैक्षणिक संस्था बंद ठेवण्याचे जाहीर केल्याचे मुख्यमंत्र्यांच्या ट्विटचे बनावट स्क्रीनशॉट तसेच आणखीन कित्येक संदेश सामाजिक माध्यमावर फिरत असल्याचे मुख्यमंत्री कार्यालयाने सांगितले आहे.
      अशा प्रकारचे ट्विट मुख्यमंत्र्यानी केले नसल्याचे आणि स्क्रीनशॉटची शहानिशा करून घेणे आवश्यक आहे. त्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या अधिकृत फेसबुक आणि ट्विटर प्रोफाईलव्दारे खात्री करून घ्यावी असे मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातर्फे खुलासा करण्यात आला आहे.
      मुख्यमंत्र्यांचे आणि मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाचे अधिकृत ट्विटर आणि फेसबुक खाती पुढीलप्रमाणे—www.twitter.com/goacmwww.facebook.com/goacmwww.twitter.com/drpramodpsawant and www.facebook.com/drpramodpsawant.