बजाज ऑटोने गोव्यात सादर केली ऑल न्यू चेतक

0
741

 

  • लेजंडरी चेतकचे आता इलेक्ट्रिक अवतारामध्ये पुनरागमन
  • पणजी ते पुणे “चेतक इलेक्ट्रिक यात्रा”ला प्रारंभ

गोवा खबर: जगातील लोकप्रिय भारतीय दुचाकी म्हणून ओळख कमावलेल्या बजाज ऑटोने आज पणजी येथे इलेक्ट्रिक अवतारामधील ऑल न्यू चेतक सादर केली. वैयक्तिक स्वातंत्र्य आणि मानवी महत्त्वाकांक्षेचे सक्षमीकरण याचे प्रतिबिंब म्हणजे ही लेजंडरी चेतक ओळखली जाते. आता इलेक्ट्रिक अवताराच्या माध्यमातून न्यू चेतक पुन्हा भारतासह जगामध्ये अधिक चांगल्या ‘हमारा कल’साठी परिवर्तन घडवण्यासाठी सज्ज झाली आहे.

आकर्षक रचना, काटेकोरपणाचा अभियांत्रिकी नमुना, अचूक निर्मिती प्रक्रिया याद्वारे हे अद्ययावत, अग्रगण्य उत्पादन साकारलेले आहे. न्यू चेतकचे अनावरण हा एक उद्घाटनाचा क्षण नाही, तर वैभवशाली इतिहासाला उजाळा देतानाच आश्वासक भविष्याची नांदी ठरणारा हा क्षण आहे.


नवी दिल्ली येथे १६ ऑक्टोबर २०१९ रोजी चेतकचे अनावरण करण्यात आले. यानिमित्त केंद्रीय रस्ता वाहतूक व महामार्ग मंत्री माननीय श्री. नितीन गडकरी यांच्या हस्ते चेतक इलेक्ट्रिक यात्रेला हिरवा झेंडा दाखवण्यात आला. या यात्रेच्या माध्यमातून २० चेतक रायडर उत्तर व पश्चिम भारतातील विविध प्रदेशांना भेट देत ३००० किलोमीटरचा प्रवास करत पुण्यात दाखल होणार आहे. दिल्ली, जयपूर, उदयपूर असा प्रवास करत ही यात्रा चितोडगडमधील चेतक स्मारक त्यानंतर अहमदाबाद, मुंबई मार्गे प्रवास करत ७ नोव्हेंबर २०१९ रोजी पणजी-गोव्यात दाखल झाली.

चेतक इलेक्ट्रिक यात्रेच्या चौथ्या टप्प्यास बजाज ऑटो लि.च्या अर्बनाइट बिझनेस विभागाचे अध्यक्ष श्री. एरिक वास यांनी हिरवा झेंडा दाखवला. आता ही यात्रा दक्षिण महाराष्ट्रातील विविध प्रमुख शहरांना भेटी देऊन अखेरीस पुण्यात पोचणार आहे.

आयकॉनिक ब्रँड

पहिली चेतक ही स्कूटरपेक्षाही जास्त काही होती. चेतकने शहरी प्रवासाचे आयाम बदलवून टाकले आणि दोन-तीन भारतीय पिढ्यांच्या आशा-अपेक्षांच्या कसोटीला उतरण्यात ती यशस्वी ठरली. लोकप्रियतेच्या सर्वोच्च शिखरावर असताना चेतक खरेदीसाठी १० वर्षांचा वेटिंग पिरेड लागत असे आणि पुनव्रिक्री किंमत ही खरेदी किमतीच्या अधिक राहत असे. एकट्या भारतातच १.३ कोटी चेतक दुचाकींची विक्री झाली होती. तिच्या अतुलनीय लोकप्रियतेमुळे ‘हमारा बजाज’ ही भावना भारतीय मनामनामध्ये रुजली गेली.

कालातीत रचना

आयकॉनिक डिझाईनमुळे चेतकला सर्वकालीन सौंदर्य प्राप्त झाले आहे. साध्या-सरळ रेषा आणि गुळगुळीत पृष्ठभाग यांच्या सुंदर मिलाफातून ही क्लासिक स्टाइल विकसित झाली आणि हे वेगळेपण सर्वच स्तरांतील लोकांना आपले वाटले.

 

आता नव्या चेतकमध्येही काळाच्या कसोटीला उतरलेल्या या डिझाईनला नवे आयाम देण्यात आले आहे. यामध्ये प्रिमिअम साहित्याचा वापर करत बारीकसारीक बाबींमध्ये आधुनिकपणा आणण्यात आला आहे.  तसेच नजरेत भरतील, स्पर्श व रूपातून दर्जा प्रतिबिंबित होईल अशा सहा नव्या रंगांमध्ये ही नवी चेतक सादर करण्यात आली आहे.

वैविध्यपूर्ण वैशिष्ट्ये

संमोहित करणारी घोड्याच्या नालाच्या आकारातील डीआरएलसह एलईडी हेडलाइड रचना, हळुवार स्पर्शानेही दाबले जाणारे इलेक्ट्रॉनिक स्विच, सिक्वेन्शियल स्क्रॉलिंग एलईडी ब्लिंकरद्वारे नवी चेतक नटलेली आहे. मोठ्या डिजिटल कन्सोलद्वारे वाहनाची माहिती स्पष्टपणे प्रदर्शित केली जाते. त्याचबरोबर हँडलबार ग्रिप, लिवर, आरसे यांपासून अलगदपणे उघडता येणारा ग्लोवबॉक्स आणि सहजपणे डॅम्प्ड सीट बंद करता येणारे तंत्रज्ञान यापर्यंत उत्तम अभियांत्रिकी कारागिरीचा नमुना या नव्या चेतकमध्ये अनुभवायला मिळतो.

अद्ययावत तंत्रज्ञान

नव्या चेतकच्या वैशिष्ट्यांचे केंद्र म्हणजे आयपी६७ रेटेड, एनसीए सेलयुक्त हाय-टेक लिथिअम आयन बॅटरी होय. सामान्य घरामध्ये असणाऱ्या ५-१५ एम्पिअर इलेक्ट्रिकल कनेक्शनद्वारे ही बॅटरी सहजपणे चार्ज करता येते. ऑनबोर्ड इंटेलिजंट बॅटरी मॅनेजमेंट सिस्टिम (आयबीएमएस)द्वारे चार्जिंग आणि डिस्चार्जिंगचे नियमन केले जाते. त्याचबरोबर, माफक किमतीमध्ये आकर्षक असे होम-चार्जिंग स्टेशनही उपलब्ध करण्यात आले आहे.

ही नवी चेतक दोन ड्राइव्ह मोड (इको, स्पोर्ट)मध्ये सादर करण्यात आली असून चालकाच्या मागणीनुसार रिव्हर्स असिस्ट मोडही उपलब्ध करण्यात आला आहे. इंटेलिजंट ब्रेक प्रणालीच्या माध्यमातून रिजनरेटिव ब्रेकिंग तंत्राद्वारे ब्रेकिंग हिटचे रुपांत कायनेटिग एनर्जीमध्ये केले जाते.

डाटा कम्युनिकेशन, सिक्युरिटी आणि युजर ऑथेन्टिकेशन आदी मोबिलिटी सेवांच्या माध्यमातून ग्राहकांना सीमलेस मालकी व प्रवासाचा अनुभव चेतक देते. चेतक मोबाईल अॅपद्वारे रायडरला आपल्या वाहनाचा व प्रवास इतिहासाबाबतची सर्वंकष माहिती उपलब्ध होते.

रोबस्ट बिल्ड

शीट मेटल बॉडी पॅनेलसह रिजिड फ्रेम आणि ट्युबलर सिंगल साइडेड सस्पेन्शनमुळे चेतकला दणकटपणा आणि टिकाऊपणा प्राप्त झाला आहे. पॉवरट्रेनरद्वारे अनोख्या सिंगल-सायडेड अॅल्युमिनिअम स्विंग आर्मचा वापर केला जातो. यातील ट्रॅक्शन मोटरद्वारे उच्च कार्यक्षमता असलेल्या अॅटोमेटेड गिअर बॉक्सद्वारे चाकाला ऊर्जा प्रदान केली जाते.

जादुई अनुभव

प्रवासासाठी शांत, सहज, आरामदायी व सुलभ, आकर्षक पण साधी, दमदार पण सुधारित अशी ही चेतक आहे. चेतक चालवण्याचा अनुभव तसेच चेतक निर्मितीची प्रक्रिया ही वास्तववादी वाटते. चाकण येथील धूळमुक्त, नियंत्रित-तापमान अशा अत्याधुनिक प्रकल्पामध्ये सर्वोत्तम साहित्य, अत्याधुनिक रोबोटिक तंत्रज्ञानाच्या साह्याने नव्या चेतकचे उत्पादन घेतले जाते. ८० टक्के महिला कामगार असलेली ही प्रॉडक्शन लाइनवर या चेतकचे उत्पादन होते.

चेतकच्या अधिक माहितीसाठी भेट द्या : www.chetak.com

जागतिक बाजारपेठ

जगभरामध्ये लोकप्रिय भारतीय दुचाकी ब्रँड म्हणून ओळख असलेल्या बजाजद्वारे दर्जेदार उत्पादनांची निर्मिती केली जाते आणि ही उत्पादने जागतिक बाजारात भारतीय वाहन उद्योगाचे दूत म्हणून कामगिरी बजावतात. २०२०पर्यंत ही नवी चेतक भारतीय सीमारेषा ओलांडून युरोपातील बाजारातही धूम करण्यास सज्ज झाली आहे. केवळ परकी चलन मिळवण्याच्या उद्देशापलीकडे जाऊन अतीशय तीव्र बाजारस्पर्धा असलेल्या जागतिक बाजारात आपला दर्जा, पत सिद्ध करण्यास चेतक यशस्वी ठरण्याची अपेक्षा आहे.

बजाज ऑटो लि.विषयी :

७९हून अधिक देशांमध्ये १.५ कोटींपेक्षा अधिक वाहनविक्री करत बजाजने ’दि वर्ल्ड्स फेवरिट इंडियन’ हे बिरुद सार्थ ठरवले आहे. ही भारताची अव्वल दुचाकी निर्यातदार असून निर्यात होणाऱ्या दर ३ दुचाकींपैकी २ दुचाकी बजाजच्या बॅजखाली निर्यात होतात. रचना, तंत्रज्ञान, दर्जा आणि ग्राहक समाधान या मापदंडांवर आधारित जगातील सर्वोत्तम दुचाकी निर्मिती करण्याचा ध्यास बाळगल्याने जगभर सर्वाधिक दिसणारा भारतीय ब्रँड म्हणून आपला ठसा उमटवला आहे. गत दशकामध्ये कंपनीच्य जागतिक विक्रीच्या माध्यमातून १३ अब्ज अमेरिकी डॉलरचे विदेशी चलन प्राप्त झाले आहे.

२०१९च्या आर्थिक वर्षामध्ये बजाज ऑटोने २० लाखांहून अधिक दुचाकी व तिचाकी वाहनांची निर्यात केली. एकूण उत्पादनातील निर्यात वाहनांचा वाटा ४० टक्के राहिला. आर्थिक वर्ष २०१९मध्ये बजाज ऑटोची एकूण उलाढाल ३१,८९९ कोटी रुपये इतकी होती.