बचत गटांनी शासकीय योजनांचा लाभ घ्यावा- श्रीपाद नाईक

0
988

गोवा खबर: बचत गटाच्या माध्यमातून महिलांना एकत्र येऊन आर्थिक सक्षमता साध्य करता येते. त्यामुळे महिला बचत गटांनी शासकीय योजनांचा लाभ घ्यावा, असे प्रतिपादन केंद्रीय आयुष राज्यमंत्री (स्वंत्र प्रभार) श्री श्रीपाद नाईक यांनी केले. त्यांच्या हस्ते आज डोंगरी येथे आधारस्तंभ या बचत गटांच्या शिखर संस्थेने शासकीय योजनांची माहिती देण्यासाठी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

महिला सक्षम झाल्यास कुटुंब सक्षम होते, पर्यायाने देश सक्षम होतो, असे ते म्हणाले. बचत गटांच्या कामासाठी खासदार निधीच्या माध्यमातून सर्वतोपरी मदत करणार असल्याचे ते म्हणाले. पंचायतीच्या माध्यमातून सर्वांनी एकत्र येऊन काम करण्याचे आवाहन त्यांनी या प्रसंगी केले.