बंदुका जमा करण्याचे आदेश

0
528

गोवा खबर:  दक्षिण गोवा जिल्हाधिकाऱ्यांनी एका आदेशान्वये दक्षिण गोवा जिल्ह्यातील कोणत्याही खुल्या जागेत, रस्ते, चौक, गल्लीत सर्वप्रकारची अग्निशस्त्रे, बंदुका किंवा लाठी, तलवारी, सुरा किंवा भाला यासारकी घातक शस्त्रे जवळ बाळगण्यास बंदी आणली आहे.

      दक्षिण गोव्यातील परवानाधारक बंधुकाधारकानी आपल्या जवळच्या पोलीस स्थानकात आपली बंदुके जमा करण्याचे आदेश दिले आहेत. जिल्हा पंचायत निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर जमा केलेली सर्व शस्त्रे परवानाधारकाना परत केली जातील.

      कोणत्याही व्यक्तीला किंवा त्याच्या मालमत्तेला धोका असल्यास त्या व्यक्तीने पोलीस महासंचालकांशी संपर्क साधावा. जिल्हाधिकाऱ्यांची खास परवानगी किंवा सूट असल्याशिवाय शस्त्रे जवळ बाळगता येणार नाहीत.