बंगाली समुदायाने गोव्यात गुंतवणूक करावी:मुख्यमंत्री

0
896
गोवा खबर: बंगाली समाज गेली चार दशके गोव्यात रुळला आहे.बंगाली समुदायाने इथली संस्कृती आत्मसात करताना आपली संस्कृती देखील जपली आहे.बंगाली उद्योजकांनी गोव्यात गुंतवणूक करावी.आम्ही त्यांचे स्वागत करू,असे प्रतिपादन मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी केले.
बंगाली कल्चरल असोसिएशन पणजी तर्फे आयोजित 39 व्या सार्वजनिक दुर्गा पूजा उत्सवाच्या उद्धाटन सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून मुख्यमंत्री उपस्थित होते.यावेळी त्यांनी उपस्थित बंगाली समुदायाशी संवाद साधला.
यावेळी उद्योजक तथा दुर्गा उत्सव समितीचे आयोजक श्रीनिवास धेंपे,पल्लवी धेंपे उपस्थित होत्या.
मुख्यमंत्री सावंत यांनी सुरूवातीला दुर्गामातेचे दर्शन घेतले.दुर्गोत्सवा निमित असोसिएशनने विविध कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.शेवटी बंगाली अन्न महोत्सवातील स्टॉलवर जाऊन मुख्यमंत्र्यांनी बंगाली पदार्थांची चव चाखली.