फ्यूचर जनराली इंडिया इन्शूरन्सकडून ‘फ्यूचर व्हेक्टर केअर – ग्रुप’चा प्रारंभ

0
959

 

मलेरिया, डेंग्यूसारख्या आजारांविरुध्द लढण्यासाठी आर्थिक आधार

 

गोवा खबर:रिटेल उद्योगातील दिग्गज फ्यूचर ग्रुप आणि जागतिक पातळीवरील विमा कंपनी असणार्‍या जनरालीची संयुक्त भागिदारी असणार्‍या फ्यूचर जनराली इंडिया इन्शूरन्स कंपनी लिमिटेड (FGII) ने ’फ्यूचर व्हेक्टर केअर – ग्रुप’ ची सुरुवात केली आहे. ही एक ग्रुप इन्शूरन्स पॉलिसी असेल जी मलेरिया, डेंग्यू, झिका व्हायरस यासारख्या व्हेक्टर बॉर्न आजारांशी लढण्यासाठी आर्थिक सहाय्य प्रदान करेल.

व्हेक्टर बॉर्न आजार म्हणजे असे आजार जे परजीवी, जीवाणू आणि विषाणूंपासून संक्रमीत होत असतात. त्यांचा प्रसार गोचीड, माशा, डास तसेच फ्लेबॉटमाईन सँडफ्लाईजपासून होतो. जागतिक आरोग्य संघटनेच्या मते संबंधित आजारांचे प्रमाण जागतिक पातळीवरील आजारांच्या एकूण 17 टक्के इतके आहे.

नवीन इन्शूरन्स पॉलिसी 65 वर्षे वयाच्या कोणत्याही व्यक्तीसाठी कोणत्याही वैद्यकीय चाचणीशिवाय उपलब्ध आहे. प्रतिव्यक्ती आणि प्रतिवर्षी 10000 ते 75000 किंमतीच्या दरम्यान रकमेचे सम इन्शूअर्ड पर्याय उपलब्ध आहेत.

हा इन्शूरन्स प्लॅन मलेरिया, डेंग्यू, लायम्फाटीक फिलारीयासीस, काळा आजार, जपानी एंसेफलायटीस, चिकनगुनिया तसेच झिका व्हायरस या आजारांसाठी सलग 24 तास हॉस्पिटलाइज्ड झाल्यास लागू होईल आणि पॉलिसीधारकाला एकरकमी फायदा मिळू शकेल.

या प्लॅनबाबत माहिती देताना फ्यूचर जनरालीचे कार्यकारी संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी के. जी. कृष्णमुर्ती यांनी सांगितले की, “डेंग्यू, मलेरिया यासारख्या व्हेक्टर बॉर्न आजारांसोबतच त्यांच्यावर उपचारांसाठी लागणारा खर्चही वाढत चालला आहे. त्यासाठी दाव्यांची संख्याही वाढली असल्याचे आमच्या निदर्शनास आले आहे. एफजीआयआयच्या माध्यमातून आम्ही नियमितपणे ग्राहकांच्या अपेक्षेनुरुप नाविण्यपूर्ण इन्यूरन्स प्रोडक्ट्स बनवण्याचा प्रयत्न करत असतो. फ्यूचर व्हेक्टर केअर पॉलिसी आमच्या त्याच तत्वाचा एक भाग आहे.”