फोंडा आणि मडगाव येथे क्रांती दिनानिमित्त हुतात्म्यांना आदरांजली

0
489

  

गोवा खबर:कला व संस्कृतीमंत्री श्री गोविंद गावडे यांनी फोंडा येथील क्रांती मैदानावर आयोजित कार्यक्रमात हुतात्मा स्मारकावर पुष्पचक्र वाहिले आणि गोवा क्रांती दिनी स्वातंत्र्य सैनिक व हुतात्म्यांना आदरांजली वाहिली. यावेळी फोंडाचे आमदार श्री रवी नाईक, नगराध्यक्ष श्री व्यंकटेश नाईक, अतिरिक्त जिल्हाधिकारी श्री अरविंद खुटकर, उपजिल्हाधिकारी श्री केदार नाईक, पोलीस निरीक्षक श्री मोहन गावडे, स्वातंत्र्य सैनिक श्री गोविंद चिमुलकर, श्री जनार्दन शिंक्रे, फोंड्याचे उप नराध्यक्ष श्री अपूर्व दळवी आणि नगरसेवक श्री रितेश नाईक व आनंद नाईक उपस्थित होते.

      यावेळी बोलताना श्री गोविंद गावडे यांनी १८ जून रोजी वार्षिक साजरा करण्यात येणा-या क्रांती दिनाचे गोमंतकीयांसाठी खास महत्व आहे. १९४६ साली याचदिनी गोमंतकीयांची देशभक्तीची भावना जनक्रांतीमध्ये प्रकट झाली आणि शेवटी १९ डिसेंबर १९६१ साली गोवा मुक्त झाला. याप्रसंगी आपण शूर स्वातंत्र्य सैनिकांच्या व हुतात्म्यांच्या सर्वोच्च त्यागाला अभिवादन करूया असे श्री गावडे म्हणाले.

      कोविड- १९ या महामारी संदर्भात बोलताना श्री गोविंद गावडे यांनी राज्यातील लोकांना चांगल्या वैध्यकिय सुविधा पुरवित असल्याबद्दल सरकारी यंत्रणाची प्रशंसा केली आणि महामारीविरूध्द घेण्यात येणाऱ्या सरकारच्या प्रयत्नांना मदत करण्याचा सल्ला लोकांना दिला.

 

                  मडगांव येथील गोवा क्रांती दिवस समारंभ

उपमुख्यमंत्री श्री चंद्रकांत कवळेकर यांनी गोवा क्रांती दिनी गोवा मुक्ती लढ्यातील हुतात्म्यांना मडगांव येथील ऐतिहासिक लोहिया मैदानावर आदरांजली वाहिली.

      श्री कवळेकर यांनी हुतात्मा स्मारकावर आणि थोर क्रांतीकारक डॉ राम मनोहर लोहिया यांच्या पुतळ्यावर पुष्पचक्र वाहिले. गोवा मुक्ती लढ्यातील स्वातंत्र्य सैनिकांच्या व हुतात्म्यांच्या त्यागाचे स्मरण करण्यासाठी  दरवर्षी  १८ जून रोजी गोवा क्रांती दिवस साजरा करण्यात येतो.

      यावेळी विरोधी पक्षनेते श्री दिगंबर कामत, आमदार श्री विजय सरदेसाई, श्री क्लाफासियो डायस, नगराध्यक्ष श्रीमती पूजा नाईक, जिल्हाधिकारी श्री अजित रॉय, अतिरिक्त जिल्हाधिकारी-१ श्री सुरेंद्र नाईक, अतिरिक्त जिल्हाधिकारी-२ श्री आग्नेलो फर्नांडिस, पोलिस अधिक्षक श्री अरविंद गावस आणि स्वातंत्र्य सेनिक संघटनेचे अध्यक्ष श्री अविनाश शिरोडकर उपस्थित होते.