फॉर्मेलिन मासळी प्रकरणात शिवसेनेची अज्ञाता विरोधात तक्रार

0
1607
गोवाखबर:शिवसेना पदाधिकाऱ्यांनी गोवा राज्य प्रमुख जितेश कामत यांच्या नेतृत्वाखाली फातोर्डा पोलिस स्थानकात रासायनयुक्त मासळी प्रकरणी अज्ञाता विरूध्द तक्रार दाखल केली आहे. अन्न आणि औषध प्रशासनाच्या अधिकार्‍यांनी मडगाव मासळी बाजारात घातलेल्या छाप्यात फॉर्मेलीनयुक्त मासळी सापडली आहे. या रसायनामुळे कर्करोग होण्याची शक्यता असते.मडगाव घाऊक बाजारातून ही विषयुक्त मासळी गोव्यातील  हॉटेल्स आणि छोट्या बाजारपेठेत विक्री साठी वितरित केली जाते. लोकांमध्ये याबाबतीत संभ्रम असुन मत्स्यप्रेमींमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अशा प्रकारचे रासायन वापरून लोकांच्या जीवाशी खेळणे  गंभीर प्रकारचा दखलपात्र गुन्हा असून दोषीं विरोधात एफआयआर नोंद करून कडक कारवाई करावी,अशी मागणी या तक्रारीच्या माध्यमातुन शिवसेनेने केली आहे.
गोयकारच शिल्लक राहिले नाही तर हे गोयकारपण कोणासाठी?  असा प्रश्न कामत यांनी उपस्थित केला आहे.
राज्य सरचिटणीस मिलिंद गावस , सचिव अमोल प्रभुगावकर, कार्यकारिणी सदस्य गुरूदास नाईक, शाखा विस्तार समिती प्रमुख राजू विर्डीकर, नियोजन समिती प्रमुख फेलीक्स डायस, प्रदीप कारेकर, सुर्यकांत नाईक, रॉफ बेग आणि शिवसैनिक उपस्थित होते.