फेरीबोटींसाठी दर निश्चित

0
362

गोवा खबर: नदी परिवहन खात्याने राज्यातील विविध जल मार्गांवर चालणाऱ्या फेरीबोटीच्या भाड्याचा दर निश्चित केला.

कुंभारजुवा-गवंडाळी, टोंक- सारमानस, जुने गोवे- पियेदाद, वळवई- मायणा, वळवई- सुर्ला, सांपेंद्र- दिवाडी, पणजी- बेती, केरी-तेरेखोल, कामुर्ली-तुये, रायबंदर-चोडण, वाशी-आंबय, नार्वे- दिवाडी, टोल्टो-धावजी, रासई-दुर्भाट, आडपई-रासई, राय-शिरोडा आणि पोंबुर्फा-चोडण मार्गावरील फेरीबोटीच्या स्पेशल ट्रीपसाठी २५० रूपये आणि कुठ्ठाळी-मडकई मार्गावरील फेरीबोटीच्या स्पेशल ट्रीपसाठी ५०० रूपये दर निश्चित केला आहे.

त्याचप्रमाणे फेरीबोटीचा व लॉंचचा आकार न धरता सरसकट भाड्याचा दर तासाला २००० रूपये निश्चित केला आहे. अर्ध्या तासापेक्षा कमी वेळ असल्यास अर्धा तास आणि  अर्ध्या तासापेक्षा जास्त वेळ असल्यास पूर्ण तास धरण्यात येईल.