फेब्रुवारीत ३१७ अपघातांमध्ये २५ जणांचा मृत्यू

0
190

फेब्रुवारी २०२० च्या रस्त्यावरील अपघातांची आकडेवारी

 गोवा खबर:वाहतूक संचालनालयाव्दारे फेब्रुवारी २०२० महिन्यात झालेल्या अपघातांचा आणि जारी केलेल्या चलन पावत्यांचा अहवाल देण्यात आला आहे.

अहवालानूसार २५ रस्त्यावरील अपघात झाले (उत्तर गोवा १० आणि दक्षिण गोवा १५) २८ गंभीर अपघात (उत्तर गोवा १० आणि दक्षिण गोवा १८) ६४ किरकोळ अपघात (उत्तर गोवा २३ आणि दक्षिण गोवा ४१) आणि २०० विना दुखापत (उत्तर गोवा ११८ आणि दक्षिण गोवा ८२) झाले आहे.

वाहतूक संचालनालयाच्या माहितीनुसार फेब्रुवारी महिन्यात एकूण ३१७ अपघात झाले आणि एकूण २५ व्यक्तींचा व्यात मृत्यू झाला. यापैकी १० उत्तर गोव्यातील तर १५ दक्षिण गोव्यातील आहेत. १६ स्वार उत्तर गोवा-०७ आणि दक्षिण गोवा ०९, ०१ मागे बसलेला दक्षिण गोव्यातील आहे. ०३ चालक, उत्तर गोवा ०१ आणि दक्षिण गोवा ०२ आणि ०४ पादचारी, उत्तर गोवा ०२ आणि दक्षिण गोवा ०२.

४५ जणांचा गंभीर अपघात झाला (उत्तर गोवा २१ आणि दक्षिण गोवा २४) तर १०७ व्याक्तींना किरकोळ जखमा झाल्या (उत्तर गोवा ३७ आणि दक्षिण गोवा ७०).

फेब्रुवारी २०२० च्या महिन्यात वाहतूक अधिकाऱ्यांकडून चलने देण्यात आली नाहीत.