फुटबॉल फीवर आता एअरटेल टीव्हीवर

0
1337

 

बहुप्रचलित फुटबॉल स्पर्धेचे थेट प्रक्षेपण, सामन्यांची संपूर्ण आकडेवारी आता एअरटेल टीव्हीवर !

गोवा खबर: फुटबॉल हा खेळ जगात सर्वांत जास्त आवडणारा आहे. स्पर्धेसाठी संपूर्ण जग सरसावून बसले असतानाच एअरटेल टीव्ही या लोकप्रिय लाइव्ह टीव्ही आणि व्हीडिओ स्ट्रीमिंग अॅपनेही आज प्रेक्षकांचा फुटबॉल बघण्याचा अनुभव अधिक मजेदार करणाऱ्या काही रोमांचक अपडेट्सची घोषणा केली.

भारतभरातील क्रीडाप्रेमी आता एअरटेल टीव्हीवर फुटबॉल स्पर्धेतील सामन्यांच्या थेट प्रक्षेपणाचा एकात्मिक अनुभव घेऊ शकतील. भारतातील वैविध्य आणि देशभर पसरलेले फुटबॉलप्रेमी लक्षात घेऊन हे प्रक्षेपण हिंदी व इंग्रजीसह अनेक प्रादेशिक भाषांमध्येही केले जाणार आहे.

आणखी काय? एअरटेल टीव्ही यूजर्सना सामन्यांचे वेळापत्रक आणि खेळाशी संबंधित थरारक घडामोडी जाणून घेता येतील. हा रोमांच आणखी वाढवण्यासाठी एअरटेल टीव्ही आपल्या यूजर्सना सामन्याच्या पलीकडील काही क्षणचित्रे आणि सामन्यांचे प्रीव्ह्यू / रिव्ह्यूही दाखवणार आहे.

या सगळ्या नवीन बदलांची मजा लुटण्यासाठी एअरटेल टीव्ही यूजर्सना केवळ त्यांचे अॅप अपग्रेड करून सर्वांत नवीन व्हर्जन घ्यावे लागणार आहे. हे व्हर्जन येत्या काही दिवसात अॅण्ड्रॉइड आणि आयओएस या दोन्ही प्लॅटफॉर्म्सवर उपलब्ध असेल.

भारती एअरटेलच्या कंटेण्ट आणि अॅप्स विभागाचे मुख्य कार्यकारी अधिकारी समीर बत्रा म्हणाले, “एअरटेल टीव्हीमध्ये आम्ही कायम आमच्या ग्राहकांना सर्वोत्तम आणि उत्तम संदर्भमूल्य असेलला कंटेण्ट देण्यासाठी प्रेरित होऊन काम करतो. टी-२० क्रिकेट स्पर्धेला आमच्या वापरकर्त्यांनी उत्तम प्रतिसाद दिल्याने, हीच जादू आगामी फूटबॉल स्पर्धेत पुन्हा निर्माण करू शकू असा आत्मविश्वास आम्हाला आहे. एअरटेल टीव्ही अॅप हे भारतातील क्रीडाप्रेमींना हवे ते सर्व देणारे ठिकाण होण्याकडे वेगाने वाटचाल करत आहे याचा आम्हाला आनंद आहे.”

जानेवारी आणि फेब्रुवारी २०१८ मध्ये एअरटेल टीव्ही अॅप हे भारतातील सर्वाधिक डाउनलोड झालेले व्हिडिओ ओटीटी अॅप ठरले. एअरटेलच्या पोस्टपेड आणि प्रीपेड ग्राहकांसाठी डिसेंबर २०१८पर्यंत एअरटेल टीव्हीचा सर्व कंटेण्ट मोफत उपलब्ध आहे.