फिफा अंडर-17 महिला विश्वचषक इंडिया 2020 अधिकृत मानचिन्हाचे अनावरण

0
1201

 

 गोवा खबर:फिफा अंडर-17 महिला विश्वचषक इंडिया 2020TM चे अधिकृत प्रतीकाचे आज, 2 नोव्हेंबर 2019 रोजी मुंबईतील ऐतिहासिक गेट वे ऑफ इंडिया येथे लोकप्रिय ताऱ्यांच्या उपस्थितीत अनावरण करण्यात आले. संपूर्ण भारत आणि जगभरातील चाहत्यांनी या स्पर्धेला सुरुवात होण्याच्या एक वर्षाआधीच या स्पर्धेचे अधिकृत प्रतीक लोकांसमोर आल्याने उत्साह आणि आशावाद अनुभवला आहे.

स्थानिक आयोजन समिती, फिफा आणि भारत सरकारच्या प्रतिनिधींनी फुटबॉलची शक्ती – आणि विशेषत: युवकांच्या स्पर्धांविषयी आणि लिंग समानतेवर लक्ष केंद्रित करून समाजात सकारात्मक बदलांना कसे प्रोत्साहन देता येईल याबद्दल चर्चा केली. अधिकृत प्रतिकाचे अनावरण करण्यासाठी अंतरंगात नयनरम्य प्रकाशाची उधळणी करून हा कार्यक्रम पार पडला, ज्यामध्ये भारत आणि फुटबॉल जगतातील अनेक तारे उपस्थित होते.

लोकप्रिय स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय ताऱ्यांसह दोन वेळची फिफा महिला विश्वचषक विजेती, ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेती आणि फिफा लीजेंड क्रिस्टीन लिली तसेच पुढच्या वर्षी चषक जिंकण्यासाठी स्पर्धेत भाग घेणाऱ्या भारतीय अंडर -17 महिला फुटबॉल संघातील सदस्या उपस्थित होत्या, ज्यांनी आज उद्घाटन झालेल्या चिन्हास प्रेरणा मिळाली आहे.

आनंददायक डिझाइनमध्ये नैसर्गिक जग आणि भारतीय संस्कृती या दोन्हीमधील रोमांचक आणि रंगीबेरंगी घटक एकत्र केले गेले. पायथ्याच्या चमकदार निळ्या लाटा ट्रॉफीच्या रूपात पायसलीच्या फळाफुलाच्या दिशेने वर पोहचतात. तरूणांच्या स्पर्धेसाठी योग्य अशा वृद्धी आणि विकासाचे प्रतीक म्हणून झेंडूच्या फुलापासून बनवलेल्या बॉलची चौकट बनवली आहे.

हजारो वर्षांपूर्वीच्या भारतीय टाय-डाय तंत्रातील बांधनी वस्त्रांवर झेंडूचा रंग आणि शैली बेतलेली आहे. झेंडूचे खोड पारंपारिक वारली चित्रांमधून घेतलेल्या ऐक्य आणि उत्सवाच्या दोलायमान प्रतीकांसहित चिन्हित केलेले आहे, परंतु बांधणीच्या नमुन्यांमध्ये सापडलेल्या तेजस्वी रंगात रंगलेले आहे.

एकत्रितपणे, घटक स्पर्धेच्या युवा उर्जेने भरलेले आहेत आणि आगामी कार्यक्रमाच्या संभाव्यतेवर जोर देतात.

माननीय क्रीडा व युवा व्यवहार मंत्री (आय / सी) श्री किरेन रिजिजू म्हणाले, “अधिकृत प्रतीकांच्या उद्घाटनात भाग घेताना मला अभिमान वाटत आहे आणि या ऐतिहासिक स्पर्धेत सहभागी होणाऱ्या आमच्या महिला संघाला आमचा दृढ पाठींबा आहे. भारतात खेळ खेळण्याची संस्कृती वाढवणे महत्वाचे आहे आणि जागरूकता आणि रूची असल्यावरच हे केले जाऊ शकते. आम्हाला आनंद आहे की अंडर -17 महिला विश्वचषकाच्या माध्यमातून आम्ही विविध योजना आणि कार्यक्रम देखील सुरू करू शकतो ज्यामुळे फुटबॉलसारखे खेळ प्रत्येकासाठी, विशेषत: तरुण मुलींसाठी सहज उपलब्ध होतील. आणि एवढेच नाही तर आम्ही महिला सक्षमीकरणासाठी मोठ्या प्रमाणावर सहभाग आणि संधींना प्रोत्साहित करून सर्व स्तरांवर फुटबॉलसाठी प्रोत्साहक संधी देखील निर्माण करू.

मुख्य महिला फुटबॉल अधिकारी सराई बरेमन म्हणाल्या की, “ही स्पर्धा सहभागी झालेल्या तरूण महिलांसाठी आंतरराष्ट्रीय स्तरावरील पहिले पाऊलच नाही तर संपूर्ण भारत आणि जगभरातील सर्व वयोगटातील मुलींना प्रेरणा देण्याची संधी आहे.” “फिफा अंडर -17 महिला विश्वचषकात समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्याची आणि लैंगिक समानतेला चालना देण्याची प्रचंड क्षमता आहे. भारतीय जनता प्रतिभावान महिला खेळाडू आणि भविष्यातील रोल मॉडेल्सना पुढच्या वर्षी मैदानावर खेळतांना बघेल आणि या रोमांचक प्रवासाच्या सुरूवातीला येथे असल्याचा मला अभिमान वाटतो.”

अनावरणप्रसंगी बोलतांना फिफा कौन्सिलचे सदस्य आणि एलओसीचे अध्यक्ष प्रफुल्ल पटेल म्हणाले की, “महिला फिफा स्पर्धेचे आयोजन देशातल्या महिला क्रीडा स्पर्धेसाठी महत्त्वाचे ठरेल. भारत आणि एआयएफएफसाठी आणखी एका ऐतिहासिक प्रसंगाचे साक्षीदार होण्याचा आम्हाला आनंद झाला आहे. फिफा अंडर -17 WWWC इंडिया 2020 या स्पर्धेसाठी फक्त एक वर्ष उरले असतांना, मी भारतातील प्रत्येकास बाहेर येऊन स्पर्धेस मोठ्या संख्येने पाठिंबा देण्यासाठी प्रोत्साहित करू इच्छित आहे. आम्ही आधी हे मुलांसाठी केले आहे, आता आमच्या मुलींसाठी करण्याची वेळ आली आहे.”

एलओसीचे स्पर्धा संचालक रोमा खन्ना पुढे म्हणाल्या की, “आमच्या स्पर्धेसाठी हा एक महत्त्वाचा टप्पा आहे. आमची केवळ एक वेगळी प्रतिमाच नाही, परंतु आगामी वर्षात स्पर्धा सुरू होईपर्यंत यामुळे एक वातावरणनिर्मिती सुद्धा होईल. या प्रतीकासह, आम्ही आता फिफा अंडर -17 महिला विश्वचषक भारत 2020 हा फुटबॉल तसेच गैर-फुटबॉल चाहत्यांमध्ये लोकप्रिय करण्यासाठी जोमाने प्रयत्न करू. भारत 2020 च्या अधिकृत प्रतीक आणि अधिकृत देखाव्याचे अनावरण करताना आम्हाला अभिमान वाटतो ज्यामुळे आम्हाला जगभरातील विलक्षण प्रतिभांचे यजमान म्हणून स्वागत करता येईल आणि अधिक मुलींना फुटबॉल खेळण्यास प्रोत्साहित करता येईल.”

फिफा अंडर -17 महिला विश्चचषक भारत 2020™ स्पर्धा 2 नोव्हेंबर ते 21 नोव्हेंबरपर्यंत आयोजित केली जाईल.