फिट इंडिया चळवळीत सक्रिय सहभागी होण्याचे मुख्यमंत्र्यांचे आवाहन

0
1068

 

गोवा खबर :मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यानी राज्यातील लोकाना फिट इंडिया चळवळीत सक्रीय सहभागी होण्याचे आवाहन


 केले.  प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी यांनी समाजातील सर्व स्तरातील लोकांमध्ये निरोगी जीवन पध्दतीचा प्रसार करण्यासाठी  फिट इंडिया चळवळीचा पहिला वर्धापन दिन साजरा करण्यासाठी फीट इंडिया एज अप्रोप्रियेट फिटनेस प्रोटोकोलचा शुभारंभ केला.

मुख्यमंत्र्यानी क्रीडा आणि युवा व्यवहार मंत्रालयाने सुरू केलेल्या उपक्रमाचे स्वागत केले आणि लोकांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यात फिटनेस शिष्टाचार सकारात्मक बदल घडवून आणणार अशी आशा त्यांनी व्यक्त केली.

मुख्यमंत्र्यानी फिट इंडिया चळवळीला पूर्ण सहकार्य देण्याचे सांगून  फिटनेस प्रोटोकोलानुसार सक्रीय जीवन पध्दतीचे उद्दीष्ठ साधण्याचे आवाहन लोकांना केले

प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी यांनी २४ सप्टेंबर २०२ रोजी फिटनेस प्रोटोकोलचा शुभारंभ केला होता जो सर्व राज्यांमध्ये अमलात आणण्यात आला आणि सर्व प्रादेशिक भाषामधून त्यासंबंधी जागृती निर्माण करण्यात आली.

 एकूण तीन वयोगटात हा फिटनेस प्रोटोकोल तयार करण्यात आला त्यात ५ ते ८ वर्षे, १८ ते ६५ वर्षे आणि ६५ व त्यावरील वयोगटाचा समावेश आहे. शारिरीक आणि मानसिक आरोग्य विकसित करण्यासाठी सर्व वयोगटासाठी अनेक तंदुरूस्तीचे कार्यक्रम आखले आहेत.