फातोर्डा स्टेडियमवरील स्टँडला माजी क्रीडामंत्री क्रुझ यांचे नाव द्या:कामत

0
1182
गोवा खबर:मडगाव येथील पं. जवाहरलाल नेहरु स्टेडियमवरील  स्टॅंडला माजी क्रिडामंत्री फ्रांसिस्को मोंत क्रुझ यांचे नाव द्यावे, अशी मागणी विरोधीपक्ष नेते दिगंबर कामत यानी मुख्यमंत्री डाॅ. प्रमोद सावंत यांच्याकडे एका पत्राद्वारे केली आहे. 

यंदाच्या आयएसएल फुटबाॅल स्पर्धे मधील गोव्यातील पहिल्या सामन्याच्या पुर्वसंध्येला मुख्यमंत्र्याना लिहीलेल्या पत्रात, विरोधीपक्ष नेत्यानी २१ मार्च १९४५ रोजी जन्मलेल्या फ्रांसिस्को मोंत क्रुझ यांचे यंदा ७५ वे जन्मवर्ष असल्याचे नमुद करून, त्यांच्या हयातीत हा नामकरण सोहळा व्हावा अशी मागणी केली आहे.
गोव्यातील पहिला आंतराष्ट्रीय स्डेडियम अवघ्या सहा महिन्यात पुर्ण करण्यात माजी क्रिडामंत्र्यांचे बहुमूल्य योगदान असल्याचे सांगुन, सदर स्डेडियम ठरलेल्या मुदतीत पुर्ण करण्यासाठी त्यांनी खुप परिश्रम घेतल्याचे म्हटले आहे. स्वतः लक्ष घालुन तसेच योग्यवेळी योग्य निर्णय घेऊन सदर स्डेडियमच्या बांधकामात सहभागी झालेल्यांना प्रोत्साहन देत त्यांनी विक्रमी वेळेत १९८९ मध्ये गोव्याचा पहिला स्डेडियम उभारला व ठरलेल्या दिवशी तेथे पहिला आंतराष्ट्रीय फुटबाॅलचा सामना खेळविण्यात आला,याकडे कामत यांनी लक्ष वेधले आहे.
फुटबाॅल, क्रिकेट तसेच इतर खेळांसाठी सदर स्डेडियमचा उपयोग होत असुन, आज गोव्यातील पहिला आंतराष्ट्रीय स्टेडियम एक शान ठरला आहे,असे सांगून कामत म्हणतात,गोव्याच्या क्रिडाक्षेत्रातील वैभवशाली असा  प्रकल्प उभारुन क्रिडाक्षेत्रास महत्वाचे योगदान देणाऱ्या गोव्याचे सुपुत्र  फ्रांसिस्को मोंत क्रुझ यांचा सन्मान करणे सरकारचे कर्तव्य आहे. सरकारने आपली सुचना मान्य करावी.