फक्त अहिंसा असलेल्या भारत देशाकडेच पुरातन काळातील ज्ञान व आजचे शिक्षण यांना जोडण्याची क्षमता: दलाई लामा

0
1184

 

गोवाखबर:‘भारतातील पुरातन काळातील माहितीची आजची गरज’ या विषयावर बोलताना म्हटले की, फक्त अहिंसा असलेल्या भारत देशाकडेच पुरातन काळातील ज्ञान व आजचे शिक्षण यांना जोडण्याची क्षमता आहे. “भारताच्या संस्कृतीत परंपरा व ज्ञान हे रुजलेले आहेत. यात ध्यान कला, अनुकंपा, निधर्मीपणा आदींचा समावेश आहे”, असे ते म्हणाले. ब्रिटीशांनी आधुनिक शैक्षणिक आणली असली तरी भारत एकमात्र देश आहे जो पुरातन ज्ञान व आधुनिक शिक्षण यांचा समतोल राखू शकतो. गोवा इन्स्टीट्यूट ऑफ मेनेजमेंट (जीआयएम)च्या कॅम्पसमध्ये तिबेटच्या धर्मगुरु दलाई लामांनी विद्यार्थी व शिक्षकवर्गासोबत आपले विचार व्यक्त केले.जीआयएम या संस्थेने देशातील भावी कॉर्पोरेट लिडर्स तयार करताना 25 वर्षे पूर्ण केली.

भारतातील पुरातन ज्ञान असलेल्या अहिंसा व अनुकंपा याविषयावर चर्चा करण्यासाठी लोकांनी अधिक प्रमाणात एकत्र येणे गरजे आहे. याशिवाय आम्ही आमच्यामधील वादविवाद कमी करण्याचा प्रयत्न करणे गरजेचे आहे. असे ते उपस्थित देशातील महत्वकांक्षी कॉर्पोरेट व्यवस्थापकांना म्हणाले.

जीआयएमचे संस्थापक संचालक पद्मश्री फा. रोमोल्ड डिसोझा म्हणाले, “आज माझी खूप वर्षांची इच्छा पूर्ण झाली आहे. तिबेटचे धर्मगुरु दलाई लामांचे आमच्या कार्यक्रमात उपस्थित असणे ही खरोखरच सन्मानाची गोष्ट आहे. नैतिकता आणि मूल्ये ही जीआयएमच्या महत्वाच्या गोष्टी आहेत ज्या 25 वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या दिवसापासून आजपर्यंत टिकून आहेत.”

पुढे जीआयएमचे संचालक अजित परुळेकर “या उत्सवपूर्ण वर्षांत मला सांगायचे आहे की आम्ही मेसेच्युसेस इन्स्टीट्यूट ऑफ टेक्नोलोजी (एमआयटी) येथे असलेल्या द दलाई लामा नैतिकता व परिरवर्तनशील मूल्ये या केंद्राशी भागीदारी केली आहे. याव्यतिरिक्त आम्ही असा एक कार्यक्रम आयोजित करणार आहोत ज्यात जीआयएमचे शिक्षकवर्ग यांना विशिष्ट कौशल्य व गोव्यातील प्रार्थमिक केंद्रामध्ये लहान वयातच नैतिकता व भावनिक शिक्षण देण्यासाठी प्रशिक्षित करणार आहोत.

25 वर्षांच्या कालावधीत जीआयएमने अनेक विभागांमध्ये प्रवेश केला असून प्रचलित बाजाराचा बारकाईने अभ्यास करून विश्लेषणात्मक  शिक्षणाचा कोर्स बिग डेटामध्ये पदवीत्तर डिप्लोमा हा कोर्स चालू केला आहे. शाश्वत व्यवसायासाठी लिडर तयार करण्याच्या जीआयएमच्या उद्दीष्टाने हा कोर्स 2018-19च्या शैक्षणिक वर्षात चालू करण्यात आहे. बिग डेटामध्ये पदवीत्तर डिप्लोमा (पीजीडीएम-बीडीए) हा दोन वर्षांचा फुल-टाईम कोर्स हा देशातील एकमेव अशाप्रकारचा कोर्स आहे. याव्यतिरिक्त या संस्थेने अटल इन्कबेशन केंद्राच्या अंतर्गत इन्कबेशन सेलची निर्मिती केली आहे. हे केंद्र 300 हून अधिक स्टार्टअपसाठी ऑक्टोबर महिन्यांत आयडियालेब 2018 चे आयोजन करणार आहे. या संस्थेने ऑक्सफोर्ड विद्यापीठाशी कोरल पर्फोमन्सचे आयोजन केले असून तो डिसेंबर 2018 मध्ये होणार आहे.

मॅसाच्युसेस इन्स्टीट्यूट ऑफ टेक्नोलॉजी (एमआयटी) येथील द दलाई लामा सेंटर फॉर एथिक्स एंड ट्रास्फोर्मेटीव वेल्युझतर्फे शाखेतील सर्व शिक्षकांना व जीआयएमच्या बोर्ड गर्वनर्ससाठी 6 महिन्यांचा तीव्र कार्यक्रम आयोजित करण्यात येईल. हा कार्यक्रमाला या महिन्यात प्रारंभ होईल. एथिक्स इनिटिएटीवचे संचालक द वनरेबल टेन्झीन प्रियदर्शी व एथिक्स इनिटिएटीवचे मुख्य कार्यकारी अधिकारी हेविअर प्रितो आयोजितर्फे साखळीतील जिआयएममधील प्रशस्त कॅम्पसमध्ये करण्यात येईल.

वर्षांमध्ये गोवा इन्स्टीट्यूट ऑफ मेनेजमेंटने देशांतील उत्कृष्ट व्यवस्थापन शाळांपैकी एक म्हणून या संस्थेला ओळखले जाते. बी-स्कुल रेंकिगच्या सर्वेक्षणातून जीआयएमची प्रगती सातत्याने दिसत आहे. ही संस्था सातत्याने देशातील अव्वल 10 खाजगी बी-स्कुलमध्ये गणली जाते. शैक्षणिक, सामाजिक व पारंपारिक विविधता ही जीआयएमची संस्थेची शक्ती आहे. या संस्थेत सध्या उत्कृष्ट विद्यार्थ्यांनी व त्यांच्या उत्कृष्ट कलांनी भरलेली आहे. जीआयएम आज उत्तम कार्यक्रमांतर्फे आव्हानात्मक व्यावसायाची गरज पूर्ण करत आहे.

मोहम्मद अली जिना पंतप्रधान व्हावे असे महात्मा गांधी यांना वाटत होते, असे तिबेटचे आध्यात्मिक धर्मगुरू दलाई लामा (८३) यांनी म्हटले आहे. गांधी यांच्या या इच्छेला पंडित जवाहरलाल नेहरू यांनी नकार दिला आणि ते स्वत: या पदावर विराजमान झाले. गांधीजींच्या या इच्छेची अमंलबजावणी झाली असती तर हिंदुस्थानचे तुकडे झाले नसते असेही दलाई लामा म्हणाले.

 

तिबेटचे धर्मगुरु दलाई लामा व जीआयएमच्या विद्यार्थ्यांमध्ये प्रश्नोत्तर झाले:

तुमचा सगळ्यात मोठा भय कोणता?

17 मार्च 1959मध्ये ज्यावेळी चीनची लोकं आक्रमक झाली व अथक प्रयत्नांनी देखील मला त्यांना शांत करता आले नाही. त्यानंतर मी खूप विचार केला व माझ्या भोवतालच्या लोकांची मते विचारली. त्यांनंतर मी तिथून पळून जाण्याचा विचार केला. हा भयावह पळवाट होता. मला त्या रात्री मी जिवंत राहू शकेल की नाही हेच माहिती नव्हते. 16 वर्षांचा असताना मी मी माझे स्वातंत्र गमावून बसलो. 24 वर्षांवर मला माझा देश गमवावा लागला. पण आपण आपल्या निर्णयवर ठाम उभे राहतो. मी पंडित नेहरूंशी खूप संवाद साधला. त्यांनी मला सांगितले की अमेरिका कधीच चीनबरोबर युध्द करणार नाही.

जर या जगातील सर्व लोक साधु झाले तर ?

जरी जगातील एक तृतीयांश लोक साधु झाले तर जनसंख्येवर नियंत्रण ठेवता येईल. पण जनसंख्या व जागतीक तापमानवाढ (ग्लोबल वॉर्मिंग) हे चिंतेचे विषय आहेत जे विश्वातील नेत्यांनी हाताळणे गरजेचे आहे.

सकारात्मक भावनेपेक्षा नकारात्मक भावना स्वीकारणे कठीण का जाते ?

सर्व विनाशात्मक भावना हे तर्क व बुध्दी यावर आधारित नसतात, ज्यामुळे ते स्वीकारणे कठीण होते. सकारात्मक भावना या नकारात्मक भावनेपेक्षा जास्त प्रबळ आहेत.  

तुमच्या मनात कोणते विचार आले ज्यावेळी तुम्ही 14वे दलाई लामा होण्याचा निर्णय घेतला?

मी खूप लहान होतो ज्यावेळी शोधकर्ते माझ्या कुटुंबाला मी पुढील दलाई लामा होणार असल्याचे सांगण्यासाठी माझ्या घरी आले. मी त्यावेळी उत्साहित होऊन त्यांच्यापाशी गेलो. मी त्यांना मागील जन्मामुळे ओळखू शकलो. आज चीन माझ्यापेक्षा पुढील दलाई लामामध्ये जास्त स्वारस्य आहे कारण त्यांच्यासाठी हा जास्त राजकीय निर्णय संबंधित आहे. प्रत्येकदिवशी जीवन अर्थपूर्ण जगायचे हेच माझे मुख्य उद्दीष्ट आहे.