प्लॅस्टिकपासून बनवलेल्या राष्ट्रध्वजाच्या वापराविरोधात गृहमंत्रालयाने जारी केल्या सूचना

0
872

 

 

गोवा खबर: स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर गृहमंत्रालयाने सर्व राज्ये/केंद्रशासित प्रदेशांचे मुख्य सचिव/प्रशासक तसेच सर्व मंत्रालये/विभागांच्या सचिवांना सूचना जारी केल्या असून भारताची ध्वज संहिता 2002 आणि राष्ट्रीय सन्मानाप्रती अपमान प्रतिबंधक कायदा 1971 मधील तरतुदींची कठोर अंमलबजावणी करायला सांगितली आहे. राष्ट्रध्वज आपल्या देशातील जनतेच्या आशा-आकांक्षांचे प्रतिनिधीत्व करतो त्यामुळे त्याला आदराचे स्थान मिळायला हवे असे या सूचनेत म्हटले आहे. यासंदर्भात व्यापक जनजागृती कार्यक्रम राबवायला हवा तसेच इलेक्ट्रॉनिक आणि प्रिंट माध्यमांतून याचा व्यापक प्रचार-प्रसार केला जावा असेही या सूचनेत म्हटले आहे.

महत्त्वपूर्ण राष्ट्रीय, सांस्कृतिक आणि क्रीडा स्पर्धांच्या आयोजनाच्या वेळी कागदी राष्ट्रध्वजाऐवजी प्लॅस्टिकपासून तयार करण्यात आलेले राष्ट्रध्वज वापरले जातात असे निदर्शनाला आले आहे. प्लॅस्टिकपासून तयार करण्यात आलेल्या राष्ट्रध्वजांचे कागदी राष्ट्रध्वजाप्रमाणे विघटन होत नाही. त्यामुळे कागदी राष्ट्रध्वजाचा वापर केला जावा असे या सूचनेत म्हटले आहे.