प्रेम नाम है मेरा.. प्रेम चोपडा!

0
1083
  1. गोवा खबर:रूपेरी पडद्यावर झळकणाऱ्या हीरो आणि हीरोइन्स चाहते खुप असतात.ही मंडळी कुठे दिसली की चाहते त्यांना गराडा घालतात.पूर्वी ऑटोग्राफ घेऊन तो जपून ठेवायची पद्धत होती.आज सेल्फीचा जमाना आहे.त्यामुळे कोणी सेलिब्रिटी भेटला रे भेटला की त्याला गाठून सेल्फी काढण्याची चढाओढ लागलेली असते.व्हिलन लोकांच्या नशीबात असे प्रसंग फार क्वचीत घडतात.
    बॉलीवुड मध्ये अनेक हीरो आणि हिरोइन्सच्या आयुष्यात विष कालवून त्यांना सळो की पळो करून सोडण्यात माहीर असलेल्या प्रेम चोपडाला आज पणजी मध्ये त्याच्या चाहत्यांनी त्याचा डायलॉग म्हणत गराडा घातला.
    वेळ दुपारी 12 ची..ठिकाण पणजी मार्केट परिसर..एका सफेद रंगाच्या कारमधुन टकलू,गोरापन आणि ऊंचपूरा व्हिलन बाहेर पडतो आणि दारूची खरेदी करण्यासाठी सिटी वाईन नामक एका वाइन शॉप मध्ये शिरतो.या परिसरात नेहमी परप्रांतीय कामगार वर्ग घोळक्याने उभा असतो.कुणाची तरी नजर चोपडांवर पडते. बघता बघता जो तो दुकानात घुसुन प्रेम चोपडां सोबत सेल्फी काढण्यासाठी धडपडू लागतो.दारू नको पण सेल्फी फॅन नको असे म्हणण्याची वेळ चोपडांवर आली नसेल तर नवल.शेवटी दुकानदाराला समोरचे शटर बंद करून चोपडा यांना निवांतपणे खरेदी करू भाग पड़ते.जेव्हा खरेदी पूर्ण होते तेव्हा शटर उघडले जाते.पुन्हा एकदा तशीच गर्दी..तशीच झुंबड. शेवटी गर्दीतून वाट काढत,सेल्फी देत व्हिलन चोपडाला तेथून काढता पाय घ्यावा लागतो.चाहत्यांचे प्रेम बघून चोपडा यांनी मोग्यांबो खुश हुवा असा थोडासा आपला नसलेला डायलॉग म्हणून हॉटेलवर पोचताच पेग मारून जीवाचा गोवा केला असेल एवढे मात्र निश्चित..