प्रामाणिक राजकारणासाठी आप हा एकच पर्याय आता गोव्यात शिल्लक आहे : राहुल म्हांबरे

0
380

 

गोवा खबर:आप हा एकच असा पक्ष आहे जो सर्वसामान्य गोवेकर जनतेचा आवाज बनलेला आहे कारण या पक्षानेच गोवेकरांच्या रोजच्या आयुष्याला भेडसावणारे प्रश्न उपस्थित केलेले आहेत. आमचे नेते प्रत्येक मुद्द्यावर अग्रेसर राहिलेले आहेत, असे प्रतिपादन आम आदमी पक्षाचे सहयोगी निमंत्रक राहुल म्हांबरे यांनी केले आहे .

पणजी येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना म्हांबरे म्हणाले,गेल्या काही वर्षांमध्ये एक  नेतृत्व आपल्या स्वतःच्या उदाहरणाने उभे केल्याबद्दल मला एल्विस यांचे आभार मानले पाहिजेत. प्रत्येक आप नेता आणि स्वयंसेवक यांना त्यांचे कार्य उत्कृष्टरित्या करण्यासाठी आधार देणे हे माझे लक्ष्य आहे.
म्हांबरे म्हणाले,आपशी  एकमत असलेल्या आणि पक्षाचे हितचिंतक असलेल्या सर्वांना आप  हा पक्ष आवाहन करीत आहे की त्यांनी पक्षात यावे आणि पक्षाच्या कार्यात सामील व्हावे. ज्याप्रमाणे गोव्यात राजकारण केले जाते, ते बदलण्याची ही एक फार मोठी संधी आहे. गोवेकरांनी हे समजून घेतले पाहिजे की सध्याच्या काँग्रेस किंवा भाजप या दोन्ही पक्षांपैकी कुणालाही जर तुम्ही मतदान केले, तरी त्याचा परिणाम हा एकच राहणार आहे. भाजप आणि काँग्रेस यांनी एकमेकांबरोबर डील आणि संगनमत केलेले असून एकमेकांबरोबर मिसळून एक भ्रष्ट व्यवस्था तयार करून ठेवली आहे. या भ्रष्ट व्यवस्थेमध्ये कोणीही सत्तेत का असेना, ते एकमेकांची काळजी घेतात व एकमेकांना सांभाळून घेतले जाते. या महामारीमध्ये लोक मरत असतानाही केवळ पैसा कमावणे, केवळ एवढाच त्यांचा एकमेव उद्देश राहिलेला आहे.
सध्या गोव्यात काय चालले आहे हे तुम्हीच बघा. आर्थिक घोटाळे आणि गैरव्यवहारांची एक मालिकाच, तीही अशा महामारीच्या काळ्या आणि बिकट काळात आपल्याला पाहायला मिळत आहे. गोव्यातील लोकांनी हे सर्व सहन करायची गरज आहे का? आम्ही हे सर्व मुद्दे वर उचललेले आहेत. पण आम्हाला अजून जास्त पाठिंब्याची गरज आहे. आम्हाला गोवा एक घोटाळामुक्त राज्य बनवायचे आहे. सर्व निकषांच्या बाबतीत एक प्रथम क्रमांकाचे राज्य बनवायचे आहे, असे  म्हांबरे म्हणाले.
आप आपल्या सर्व कार्यकर्त्यांना आवाहन करीत आहे की त्यांनी नेतृत्व आपल्या हातात घेऊन पक्षाला गोवेकरांपर्यंत पोहोचवण्याचे कार्य करावे. पक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्ते अगदी खालच्या मूळ स्तरावर कार्य करीत असून आप आता बूथ स्तरावरील जडणघडण अधिक मजबूत करण्याचे नियोजन करीत आहे. राहुल पुढे म्हणाले की आमचे स्वयंसेवक “गोवन्स अगेन्स्ट कोरोना ” मोहिमेसाठी खूप कष्टाने काम करीत आहेत आणि अशा कठीण काळामध्ये गोवेकरांना मदतीचा हात देत आहे. कुठल्याही पेशात असलेल्या लोकांना पक्षात सामावून घेण्यास आम्ही तयार आहोत, ज्यांना एक असा प्रामाणिक पर्याय हवा आहे जो सरकार स्थापन करून गोव्यातील लोकांच्या भल्यासाठी कार्यरत राहील.
“आम्ही एक प्रचंड मोठ्या स्तरावरची सदस्य नोंदणी मोहीम आता लगेच सुरू करणार आहोत. ज्या लोकांना गोव्याच्या विकासासाठी काम करायची इच्छा आहे, अशांसाठी आमच्या पक्षाची दारे उघडी आहेत ” असे  म्हांबरे यांनी स्पष्ट केले आहे.