प्रसून जोशी सेन्सॉर बोर्डाचे नवे अध्यक्ष

0
1089

सेन्सॉर बोर्डाच्या अध्यक्षपदी प्रसिद्ध गीतकार प्रसून जोशी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पहलाज निहलानी यांना पदावरुन हटवण्यात आल्याने त्यांच्या जागी जोशी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

निहलानी यांनी आतापर्यंत अनेक चित्रपटांची निर्मिती केली. सेन्सॉर बोर्डाच्या अध्यक्षपदावर असताना त्यांनी चित्रपटातील विविध आक्षेपार्ह दृष्यांना तसेच शब्दांना कात्री लावली. आज त्यांना सेन्सॉर बोर्डाच्या अध्यक्षपदावरुन दूर केले गेले. आता त्यांच्या जागी प्रसून जोशी यांची वर्णी लागली आहे. जोशी यांना 2007, 2008 आणि 2014 यामध्ये तीनवेळा ‘सर्वोत्कृष्ट गीतकार’ या फिल्मफेअर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तसेच त्यांना राष्ट्रीय पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले आहे. याशिवाय त्यांना भारत सरकारच्या प्रतिष्ठित अशा पद्मश्री या नागरी पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले आहे.

दरम्यान, जोशी यांच्या नियुक्तीबरोबरच बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री विद्या बालन यांची सेन्सॉर बोर्डावर सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे.