प्रसिद्ध इस्रायली दिग्दर्शक डैन वोलमनला यांचा इफ्फीत जीवनगौरव पुरस्काराने होणार सन्मान

0
1002

भारतीय आंतर्राष्ट्रीय चित्रपट महोत्सव 2018 मध्ये इस्रायल कंट्री  फोकस  देश

 

रॅम्बो-3’, ‘म्यूनिक’ आणि ‘द डार्क नाइट राइजेज़चा अभिनेता अलॉन अबाउटबाउल इस्रायली  प्रतिनिधिमंडळाचा भाग म्हणून  विशेष अतिथि असेल

 

हाइड अँड सीक’, ‘टाइड हैंड्स’ आणि ‘ऍन इजरायली लव स्टोरी’ या चित्रपटांसाठी प्रसिद्ध इस्रायली दिग्दर्शक डैन वोलमनला जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित केले जाणार

 गोवा खबर:दरवर्षी  भारतीय आंतर्राष्ट्रीय चित्रपट महोत्सव (इफ्फि) मध्ये एक असा देश केंद्रस्थानी असतो जो आपल्या देशातील सिनेमाची उत्कृष्टता आणि  योगदान सर्वासमोर आणतो. यावर्षी  49 व्या  इफ्फित इस्रायल हा फोकस देश असणार आहे. मुंबईतील इस्रायलच्या वाणिज्य दूतावासध्या सहकार्याने  ‘कंट्री फोकस’ श्रेणी मध्ये या देशाचे 10 चित्रपट निवडण्यात आले आहेत.

 या  ‘कंट्री फोकस’ श्रेणी मध्ये प्रदर्शित होणारा पहिला चित्रपट अवी नेशेर यांचा ‘द अदर स्टोरी हा असेल. या श्रेणीत दाखवण्यात येणाऱ्या अन्य चित्रपटांमध्ये’फुटनोट’, ‘द अदर स्टोरी’, ‘द बबल’, ‘वर्किंग वुमन’, ‘द अनऑर्थोडॉक्स’, ‘लॉन्गिंग’, ‘पैरा अडूमा’, ‘रिडेंप्शन’, ‘शालोम बॉलीवुडः द अनटोल्ड स्टोरी ऑफ इंडियन सिनेमा’ आणि ‘वॉल्ट्ज विद बशीर’यांचा समावेश आहे.

इस्रायली प्रतिनिधिमंडळात सहभागी प्रसिद्ध इस्रायली अभिनेता अलॉन अबाउटबाउल विशेष अतिथि असेल.

‘रॅम्बो -3′, स्टीवन स्पीलबर्गचा  ‘म्यूनिक ‘, रिडली स्कॉटचा ‘बॉडी ऑफ लाइज़’, ‘लंडन हॅज फॉलन’ आणि  ‘द डार्क नाइट राइजेज़’ सारख्या हॉलीवुड चित्रपटातील दमदार अभिनयासाठी ओळखला जाणारा प्रसिद्ध इस्रायली अभिनेता अलॉन अबाउटबाउल इस्रायलच्या प्रतिनिधिमंडळाचा भाग म्हणून या महोत्सवात विशेष अतिथी असेल. आपल्या  धीरगंभीर आवाजासाठी प्रसिद्ध या अनुभवी अभिनेत्याने प्रदीर्घ काळापासून हबीमा थियेटर सह अनेक ठिकाणी रंगमंचावर नाटक केले आहे ज्यात हैमलेट, केवियार अँड लेंटिल्स, ब्लड ब्रदर्स, क्लोज़र आणि फरगिवनेस यांचा समावेश आहे.

अबाउटबाउलच्या लोकप्रिय चित्रपटांमध्ये इस्रायल चित्रपट ‘शिवा’ (2008) आणि  रिडली स्कॉटचा अमेरिकन चित्रपट ‘बॉडी ऑफ लाइज़’ यांचा समावेश आहे ज्यात त्यांनी लियोनार्डो डिकैप्रियो आणि रसेल क्रो सारख्यांबरोबर काम केले आहे. अबाउटबाउल यांनी नंतर  यीगल बर्स्टाइन यांच्या ‘हैंड ऑफ गॉड’ चित्रपटात मोशे इवगी आणि  डॉरिट बर-ओर यांच्याबरोबर काम केले. मोशे इवगी बरोबर त्यांनी केलेल्या कामासाठी दोघांना जेरुसलेम चित्रपट महोत्सवात सर्वोत्तम अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला होता.

याशिवाय अबाउटबाउल याना गोव्यात पार पडलेल्या  44व्या भारतीय आंतर्राष्ट्रीय चित्रपट महोत्सवात  (इफ्फी)  इफ्फी सर्वोत्तम अभिनेता पुरस्कार प्रदान करण्यात आला होता.

‘हाइड अँड सीक’, ‘टाइड हैंड्स’ या चित्रपटांमुळे सुपरिचित असलेले इस्रायल दिग्दर्शक डैन वोलमैन यांना जीवनगौरव पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे.

डॅन  वोलमैन इस्रायलचे अनुभवी लेखक, दिग्दर्शक आणि निर्माते आहेत जे  ‘हाइड एंड सीक’ (1980), ‘टाइड हैंड्स’ (2006) आणि  ‘बेन्स बायोग्राफी’ (2003) सारख्या चित्रपटांसाठी ओळखले जातात. वोलमैन यांचे चित्रपट कान्स ,व्हेनिस , बर्लिन, शंघाई, गोवा आणि  मॉस्को मधील अंतर्राष्ट्रीय चित्रपट महोत्सवात दाखवण्यात आले असून त्यांच्या चित्रपटांनी जगभरात अनेक पुरस्कार मिळवले आहेत. विशिष्ट दृष्टिकोण आणि अभिनव कामासाठी डॅन याना जेरुसलेम आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात जीवनगौरव पुरस्कार आणि  शिकागो आंतर्राष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ‘सिल्वर ह्यूगो’ पुरस्कार मिळाला होता. इस्रायल  सिनेमा आणि संस्कृतीमध्ये त्यांनी मिळवलेले यश आणि दिलेले योगदान यासाठी त्यांना जानेवारी 2015 मध्ये  ‘एरिक आइंस्टाइन’ पुरस्कार देण्यात आला होता.  वर्ष 2016 मध्ये डॅन यांनी इस्रायल चित्रपट अकादमीचा ‘ दि ओफिर लाइफ टाइम अचीवमेंट’ पुरस्कार जिंकला होता.

वोलमैन यावर्षी मार्च महिन्यात गोव्यात आले होते, तेव्हा पणजी येथे आयोजित एका  कला महोत्सवात त्यांचा  ‘एन इजरायली लव स्टोरी’ चित्रपट दाखवण्यात आला होता. 2017 मधील हा चित्रपट 1947 च्या काळातील एका प्रेम कथेवर आधारित होता.

डैन वोलमैन गोवा इथे 2011 मध्ये आयोजित 42 व्या भारतीय आंतर्राष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या ज्युरींपैकी एक होते.

इस्रायलच्या 10 निवडक चित्रपटांखेरीज 49 व्या इफ्फीमध्ये 22 नोव्हेंबर 2018 रोजी भारत-इस्रायल सह-निर्मिती चर्चासत्राचे आयोजन केले जाणार आहे.

‘कंट्री फोकस पैकेज’ मध्ये निवडण्यात आलेल्या चित्रपटांचा संक्षिप्त परिचय:

  1. फुटनोट

दिग्दर्शक : जोसेफ सीडर

वर्ष 2011 मधील या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन  जोसेफ सीडर यांनी केले आणि  श्लोमो बारबा व लियोर अशकेनाज़ी यांनी यात अभिनय केला होता. याची कथा  एक पिता आणि मुलगा यांच्यातील तणावग्रस्त संबंधाभोवती फिरते. हे दोघेही जेरुसलेमच्या  हीब्रू विद्यापीठाच्या टॅलमड विभागात शिकवत असतात.

या चित्रपटाला 2011 मध्ये कान्स चित्रपट महोत्सवात सर्वोत्कृष्ट  पटकथेचा पुरस्कार मिळाला होता. त्याच वर्षी ओफिर पुरस्कारांमध्ये  ‘फुटनोट’ ने नऊ पुरस्कार पटकावले होते आणि  84 व्या ऑस्कर पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट परदेशी भाषा चित्रपट विभागात इस्रायलकडून हा चित्रपट पाठवण्यात आला होता. 18जानेवारी 2012 रोजी या चित्रपटाने ऑस्कर पुरस्कारासाठी निवडण्यात आलेल्या नऊ चित्रपटांमध्ये स्थान मिळवले होते.

  1. द अदर स्टोरी

लेखक, निर्माता आणि दिग्दर्शक :अवी नेशेर

वर्ष 2018 मधील या चित्रपटात अतिशय संवेदनशीलपणे आणि प्रेमाने एका अकार्यशील कुटुंबाचा भाग असल्याचे दुःख मांडण्यात आले आहे तसेच कशा प्रकारे हे कुटुंब त्यांच्या मुलीचा धार्मिक  पश्चाताप हाताळण्याचा प्रयत्न करतो याचे चित्रण केले आहे.हे एक भावनिक नाट्य आहे जे इस्रायल समाजाच्या वास्तवतेचे दर्शन घडवते.

‘द अदर स्टोरी’हा या महोत्सवात ‘कंट्री फोकस’ गटात दाखवण्यात येणारा पहिला चित्रपट असेल. 2018 च्या टोरोंटो अंतर्राष्ट्रीय चित्रपट महोत्सवात समकालीन जागतिक सिनेमा विभागात हा चित्रपट दाखवण्यात आला होता. याशिवाय हाइफा चित्रपट महोत्सवात  प्रदर्शित होणारा हा पहिला चित्रपट होता.

 1. लॉन्गिंग

दिग्दर्शक :सावी गैबिझॉन

लॉन्गिंग’ हा 2017 मध्ये आलेला इसराईल विनोदी चित्रपट आहे. हा चित्रपट इसराईलच्या एकर शहरात घडतो. यामध्ये एका मध्यमवयीन अविवाहित इस्रायल व्यक्तीची कथा आहे. जो आयुष्यातील त्याच्या आतापर्यंतच्या निर्णयांचे मूल्यांकन करण्यास प्रवृत्त होतो जेव्हा त्याला समजते की त्याच्या जुन्या प्रियसीने 20 वर्षांपूर्वी त्याच्या मुलाला जन्म दिला होता.

2017 च्या टोरंटो आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात समकालीन जागतिक सिनेमा विभागात हा चित्रपट दाखवण्यात आला आहे. 2017 च्या ओफिर पुरस्कारांमध्ये ‘लॉन्गिंग’ ला 13 नामांकन आणि सर्वोत्कृष्ट पटकथेचा पुरस्कार मिळाला आहे.

 1. पैरा अडूमा (रेड काऊ)

दिग्दर्शक- सिविया बरकाइ याकोव

पूर्व जेरुसलेमच्या जुन्या शहरापासून काही अंतरावर असलेल्या परिसरात ‘रेड काऊ’ चित्रीत करण्यात आला असून यामध्ये एक 16 वर्षाची मुलगी बेनी (एवीगेल कोवारी) आणि तिचे धार्मिक पिता येहोशुवा (गैल टोरेन) यांच्यातील नात्यांवर आधारित आहे. तिचे वडील उग्रवादी इसराईल गटाचे नेतृत्व करत आहेत जे चित्रपटाच्या नावाप्रमाणे एक लाल वासरू पाळत असतात. त्यांचा विश्वास असतो की ते ज्यू लोकांसाठी नवीन युगाची पहाट घेऊन येईल आणि ते माऊंट मंदिरात परत जाऊ शकतील जिथे त्यांना गेली अनेक वर्षे जायला बंदी घालण्यात आली होती.

‘रेड काऊ’ हा चित्रपट रॅबिनची हत्या झालेल्या काळात घडलेला आहे यामध्ये बेनीच्या आयुष्याचे चित्रण करण्यात आले आहे. तिची आई तिच्या जन्माच्यावेळी मरण पावली. तिचे वडील येहोशुवा धार्मिक, उग्रवादी कार्यकर्ते आहेत आणि महत्त्वपूर्ण वळणावर तिच्यामध्ये लैंगिक, धार्मिक आणि राजकीय जागरुकता निर्माण होत आहे.

 1. रिडेंप्शन

दिग्दर्शक- जोसेफ मैडमॉनी, बोएज़ येहोनेटन याकोव

सन 2018 मध्ये प्रदर्शित या चित्रपटाची कथा मेनाचेमची आहे. जो एका रॉक बॅण्‍डचा प्रमुख सदस्य होता आणि आता धार्मिक बनला आहे. त्याला एक सहा वर्षांची मुलगी आहे. जेव्हा त्याच्या मुलीला कर्करोग झाल्याचे निदान होते तेव्हा त्याला तिच्यावर महाग उपचारांसाठी निधी जमवण्यासाठी एक सर्जनशील उपाय शोधावा लागतो. तेव्हा तो पुन्हा एकदा त्याच्या बॅण्डच्या शेवटच्या दौऱ्यावर जातो. आपल्या मुलीला वाचवण्याच्या या प्रवासात जुन्या जख्मा उफाळून येतात आणि तो पुन्हा एकदा त्याच्या धर्मनिरपेक्ष भूतकाळाशी जोडला जातो. त्याला जाणवते की, त्याचा भूतकाळ आणि संगीत हेच त्याच्या मोक्षाचा मार्ग सुकर करू शकतील.

 1. शालोम बॉलीवुडः द अनटोल्ड स्टोरी ऑफ इंडियन सिनेमा

दिग्दर्शक- डैनी बेन-मोशे

‘शालोम बॉलीवुडः द अनटोल्ड स्टोरी ऑफ इंडियन सिनेमा’ या माहितीपटाची लांबी खूप मोठी असून यामध्ये जगातील सर्वात मोठ्या चित्रपट उद्योगाचा गायन आणि नृत्याचा इतिहास याचे चित्रण आहे. यामध्ये भारतीय ज्यू समाजाच्या 2000 वर्ष जुन्या कालखंडाचा आणि जगातील सर्वात मोठ्या चित्रपट उद्योगाला आकार देण्यास त्यांनी बजावलेली भूमिका दर्शवली आहे.

हा चित्रपट काही सुंदर ज्यू मुलींच्या आयुष्याच्या माध्यमातून आपली कथा सांगतो. जी विसाव्या शतकाच्या सुरुवातीपासून आतापर्यंत भारतीय चित्रपटांवर राज्य करणाऱ्या तारा बनल्या. 1920 च्या मूक चित्रपटांपासून आपण सुलोचना (रूबी मायर्स) हिला भेटतो जी भारतीय सिनेमाची पहिली महिला सुपरस्टार होती. त्यानंतर 1930 च्या कालखंडात मिस रोज (रोज एजरा) ही बॉलिवूडच्या पार्टी दृश्यांमध्ये दिसायची. 1940 मध्ये प्रमिला (एश्थेर अब्राहम) होती जी देशाची पहिली मिस इंडिया बनली. त्यानंतर 1950 आणि 1960 च्या सुवर्ण युगात नादिरा (फरहत एजकील) बॉलिवूडची सर्वात मोठी खलनायिका बनली.

या चित्रपटाचा जागतिक प्रिमीयर 2017 मध्ये मामी मुंबई फिल्म महोत्सवात झाला होता. 2018 च्या ज्यू भारतीय व दक्षिण-पूर्व आशियाई चित्रपट महोत्सवात देखील दाखवण्यात आला होता.

सध्याच्या काळात बॉलिवूडचे ज्येष्ठ कलाकार ऋषी कपूर यांच्यासह अनेक कलाकार या चित्रपटात दिसतात. जे ज्यू कलाकारांच्या प्रभावाबद्दल आणि चित्रपट उद्योगाबद्दल भाष्य करतात.

 1. द बबल

दिग्दर्शक :आइटन फॉक्स

हा चित्रपट तेल अवीव शहरातील तरुण मित्रांच्या गटावर आधारित आहे आणि ते या शहरासाठी एक प्रेम गीत देखील आहे तसेच तेल अवीवमधील लोक उर्वरित देशापासून वेगळे आहेत आणि तिथे काय उलथापालथ सुरु आहे हे शोधण्याचा एक प्रयत्न देखील आहे. हा चित्रपट समलिंगी, भिन्नलिंगी , ज्यू,आणि अरबी, महिला आणि पुरुष यांच्या दृष्टिकोनातून तेल अवीवमधील तरुणांच्या आयुष्यावर दृष्टिक्षेप टाकतो. नोम नावाच्या एका इस्रायली सैनिकापासून या चित्रपटाला;सुरुवात होते. तो राखीव दलांसाठी काम करत असतो  आणि एक दिवस अचानक एका तपास नाक्यावर अश्रफ नावाच्या एका पॅलेस्टिनी व्यक्तीशी त्याची भेट होते. त्यांनतर एकदा नोमचे ओळखपत्र तपास नाक्यावर हरवते. अश्रफ नोमच्या घरी पोहचतो जिथे तो एक समलिंगी व्यक्ती आणि एका युवतींबरोबर राहत असतो.

 1. द अनऑर्थोडॉक्स

दिग्दर्शक : एलिरन माल्का

या  चित्रपटात  1983 चा कालखंड दाखवण्यात आला असून तो याकोव कोहेनच्या भोवती फिरतो. याकोव्ह एका जेरुसलेम प्रिंटिंग प्रेसचा मालक आहे आणि त्याच्या मुलीला वांशिक कारणावरून शाळेतून काढून टाकण्यात आले आहे. याकोव या अन्यायाविरोधात लढायचे ठरवतो. मात्र त्याच्याकडे कुठलेही ज्ञान, पैसा , संपर्क आणि राजकीय अनुभव नसतो. परंतु त्याच्याकडे याविरोधात पावले उचलण्याची इच्छाशक्ति आहे, धमक आहे आणि विश्वास आहे की त्याला आणि त्याच्या अन्य सेफार्डिक ज्यू नागरिकांना ताठ मानेने सन्मानाने जगता यायला हवे. याकोव दोन मित्रांनाही सोबत घेतो आणि ते जेरुसलेममध्ये पहिला वांशिक राजकीय पक्ष सुरु करतात. याचे वैशिष्टय आहे कि ते ज्या लोकांचे प्रतिनिधित्व करतात त्यामध्ये सुटाबुटातील लोक नसून संघर्ष करणारे सामान्य नागरिक आहेत.

 1. वॉल्ट्ज विथ बशीर

दिग्दर्शक: एरी फोल्मन

‘वॉल्ट्ज विथ बशीर’ हा 2008 मध्ये आलेला एक इस्रायली एनिमेटेड युद्ध माहितीपट आहे. यात फोल्मन यांनी 1982 च्या लेबनान युद्धात एक सैनिक या नात्याने आलेल्या आठवणींचा शोध घेतात. एकदा एका रात्री एका बारमध्ये एक जुना मित्र दिग्दर्शक एरी याना त्याला वारंवार पडणाऱ्या एक स्वप्नाबद्दल सांगत  असतो. स्वप्नात २६ हिंसक कुत्रे त्याचा पाठलाग करत असतात.

प्रत्येक रात्री या कुत्र्यांची संख्या तेवढीच असते.हे दोघे असा निष्कर्ष काढतात कि याचा संबंध 80 च्या दशकात सुरु झालेल्या पहिल्या लेबनान युद्धातील त्यांच्या इस्रायली सैन्य मोहिमेशी आहे. मात्र त्या काळातील काहीही आठवत नसल्यामुळे एरी बेचैन आहे. याचा शोध घेण्याच्या उद्देशाने तो जगभरातील आपले मित्र आणि सहकारी यांना भेटून त्यांच्याशी संवाद साधण्याचा निर्णय घेतो. जसजसा एरी या रहस्यच्या मुळाशी जातो त्याला सगळे आठवायला लागते.

2008च्या कान्स महोत्सवात ‘वॉल्ट्ज विद बशीर’ दाखवण्यात आला होता.सर्वोत्कृष्ट परदेशी भाषेतील चित्रपटासाठी गोल्डन ग्लोब पुरस्कार, सर्वश्रेष्ठ चित्रपटाचा एनएसएफसी पुरस्कार, सर्वोत्तम परदेशी चित्रपटासाठी सीज़र पुरस्कार आणि माहितीपटासाठी आईडीए पुरस्कार जिंकला आहे. तसेच सर्वोत्तम परदेशी भाषेतील चित्रपटासाठी अकादमी  पुरस्कार, बिगर-इंग्रजी भाषेतील चित्रपटासाठी बाफ्टा पुरस्कार आणि सर्वोत्तम एनिमेटेड चित्रपटासाठी एनी पुरस्कारासाठी याचे नामांकन झाले होते.

 1. वर्किंग वुमन

दिग्दर्शक: माइकल अवियाद

कामाच्या ठिकाणी होणाऱ्या शोषणावर हा चित्रपट आधारित आहे आणि यात प्रमुख भूमिका करणाऱ्या लिरोन बेन सुल्श हिने दमदार अभिनय केला आहे. ही कथा  ओर्ना या स्त्रीची आहे जिला कार्यलयात काम करणे असह्य होते जेव्हा तिचा  बॉस तिला पदोन्नती देऊन गैरफायदा उठवण्याचा प्रयत्न करतो. तिचा पती आपल्या नवीन हॉटेलच्या व्यापात संघर्ष करत आहे. या परिस्थितीत तीन मुलांच्या पालनपोषणाची जबाबदारी प्रामुख्याने तिच्यावर येते. शेवटी जेव्हा तिचे आयुष्य भरकटते तेव्हा तिला स्वतःला सांभाळावे लागेल जेणेकरून आपली नोकरी आणि आत्मसन्मानसाठी आपल्या पद्धतीने ती लढू शकेल.