
डी डी न्यूजसाठीच्या 17 नव्या डीएसएनजी व्हॅनला केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी आज हिरवा झेंडा दाखवला.
गोवा खबर:बहुविध कॅमेऱ्यांमार्फत व्हिडिओ स्ट्रीमद्वारे थेट प्रसारण या व्हॅन करु शकणार आहेत. हाय डेफीनेशनमधे प्रसारण करण्यासाठी या व्हॅन अनुरुप असल्याने प्रेक्षकांना उच्च दर्जाचे प्रक्षेपण अनुभवता येणार आहे. सार्वजनिक प्रसारणकर्ता प्रसार भारतीच्या स्वायत्ततेचे महत्व जावडेकर यांनी अधोरेखित केले.
‘प्रेस फ्रिडम’ सर्वोच्च असल्याचे ते म्हणाले. प्रसार भारतीने यु ट्युब, ट्विटर आणि फेसबुक या समाजमाध्यमांपर्यंत आपली व्याप्ती वाढवली असल्याबद्दल त्यांनी प्रशंसा केली. माहिती आणि प्रसारण सचिव अमित खरे यांनी देशातल्या घडामोडींच्या थेट प्रक्षेपणासंदर्भातल्या उपक्रमाचे महत्व विषद केले .