प्रशासन उत्तम चालवण्याचे आव्हान आम्ही यशस्वी पेलले : मुख्यमंत्री

0
1269
गोवा खबर: गेल्या वर्षी मनोहर पर्रीकर यांच्या निधनानंतर राज्यातील प्रशासन चालवणे मोठे आव्हान होते.आमच्या  सरकारने ते आव्हान यशस्वीपणे पेलून दाखवले आहे.पर्रिकर यांच्या स्वप्नातील विकसित गोवा साकारण्यासाठी जिल्हा पंचायत निवडणूकांमध्ये भाजपच्या उमेदवारांना प्रचंड मताधिक्यांनी विजयी करा, असे आवाहन मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी आज खोर्ली येथे केले.
 मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी आज खोर्ली मतदारसंघातील भाजपचे उमेदवार सिध्देश नाईक यांच्यासाठी प्रचार सभा घेत नाईक यांना विजयी करण्याचे आवाहन केले.
  स्वच्छ आणि सुंदर गोवा हे पर्रिकर यांचे स्वप्न आम्हाला पूर्ण करावे लागेल,असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले, पर्रिकर यांच्या कार्यकाळात सुरु झालेले सर्व प्रकल्प पूर्ण करण्याचा प्रयन्त माझे सरकार करणार आहे.त्याच बरोबर जिल्हा पंचायत निवडणूकांमध्ये भाजपला विजयी करून  पर्रीकर यांना खरी श्रद्धांजली वाहण्याची संधी कार्यकर्त्यांना मिळाली असून सध्याचे चित्र पाहीले तर दोन्ही जिल्हा पंचायतींवर भाजपचीच सत्ता येईल यात अजिबात दुमत नाही.
मुख्यमंत्री सावंत म्हणाले “अत्यंत कठीण परिस्थितीत राज्यातील  प्रशासनाची सुत्रे मी हाती घेतली. दिवंगत माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी घालून दिलेल्या मार्गावरुनच आपण राज्य कारभार चालवत आहे.पायभूत सुविधा निर्माण करण्याबरोबरच रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यावर सरकारचा भर असणार आहे. लोकांचे जीवनमान ऊंचावून राज्याला नंबर वन करण्यासाठी आपले सरकार सदैव कार्यरत असणार आहे.
मुख्यमंत्री म्हणाले,पर्रिकर यांच्या पश्च्यात एक वर्ष राज्य कारभार चालवताना खुप काही शिकायला मिळाले. त्याचा सरकार चालवण्यासाठी उपयोग झाला.शहरी भागाच्या विकासाबरोबर ग्रामीण विकासाला प्राधान्य देत सर्वांगीण विकास साधणे हे भाजप सरकारचे धेय आहे.