
गोवा खबर:भारतीय रेल्वेने पहिल्यांदाच तक्रार व्यवस्थापन यंत्रणेचे पूर्णत: डिजिटायझेशन केले आहे. रेल्वे पॅसेंजर ग्रीव्हान्स रिड्रेसल ॲण्ड मॅनेजमेंट सिस्टीम ही यंत्रणा उत्तर रेल्वेने (दिल्ली विभाग) विकसित केली आहे. या यंत्रणेमुळे विविध निकषांवर आपल्या कामगिरीचे मूल्यांकन कराराला रेल्वेला साहाय्य मिळणार आहे. प्रवाशांच्या तक्रार निवारणीची प्रक्रिया जलद गतीने आणि अधिक सुरळीत होण्यासाठी रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी आज या यंत्रणेंतर्गत ‘रेल मदद’ या ॲपचा शुभारंभ केला. ‘रेल मदद’ मोबाईलॲप्लिकेशन फॉर डिझायर्ड असिस्टन्स ड्यूरिंग ट्रॅव्हल मोबाईल ॲप असून प्रवाशांनी केलेल्या तक्रारीवर करण्यात आलेल्या कारवाईची माहिती प्रवाशांना एसएमएसद्वारे कळवण्यात येईल. विविध हेल्पलाईन क्रमांक यावर असतील.