प्रयोग सांज २८ नोव्हेंबर रोजी

0
111

गोवा खबर : मंगेशी – फोंडा येथील शिवप्रणव दामोदर आळवणी यांच्यातर्फे शनिवार २८ नोव्हेंबर २०२० रोजी सायं. ६.३० वा. पाटो – पणजी येथील संस्कृती भवनमध्ये केळुरितला नाटक हा सांगितीक एकपात्री प्रयोग सादर केला जाणार आहे, असे कला आणि संस्कृती संचालनालयातर्फे कळविण्यात आले आहे.

आळवणी यांची ही संकल्पना असून, ते ती सादर करतील. त्यांना संवादिनीवर गौतम दामले, तर तबल्यावर  सोहम रानडे साथ करतील.

प्रथम येणार्‍यास प्रथम या तत्त्वावर ५०-६० अशा मर्यादित स्वरूपात प्रेक्षकांना प्रवेश दिला जाईल. सरकारने जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करून ऑक्टोबर २०२० पासून हा उपक्रम खात्यातर्फे सुरू करण्यात आला आहे.

इच्छुक रंगभूमी संस्था, दिग्दर्शक व कलाकार यांनी आपल्या प्रयोगाच्या सादरीकरणासाठी खात्याशी संपर्क साधावा. पूर्वी अर्ज केलेल्या पण प्रयोग सादर करू न शकलेल्या संस्था, कलाकार यांनी पुन्हा नव्याने अर्ज करावा.

यावेळी, सोसल डिस्टन्सिंग, सॅनिटाईझिंग, मास्क वापरणे इ. सरकारच्या मार्गदर्क तत्त्वांचे पालन केले जाईल, असे माहिती व प्रसिद्धी खात्यातर्फे कळविण्यात आले आहे.