प्रमाणित पोल्ट्री उत्पादनांच्या प्रवेशास सरकारची परवानगी

0
640

गोवा खबर:अंडी रोगमुक्त असून ती मानवी वापरासाठी योग्य असल्याचे संबंधित सरकारी खात्याच्या सक्षम प्राधिकरणाने प्रमाणपत्र दिल्यानंतरच राज्यात अंड्यांची वाहतूक करण्यास सरकारने परवानगी दिली आहे.

 कर्नाटक व केरळ राज्यात एव्हिना इन्फ्लुएन्झा (बर्ड फ्लू) आढळून आल्यानंतर, अंड्यांसहित पोल्ट्री आणि इतर संबंधित उत्पादनांच्या प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष आयात आणि प्रवेशावर सरकारने बंदी घातली होती.

पक्षी व पोल्ट्रीमध्ये एव्हिना इन्फ्लुएन्झा किंवा अशा इतर कोणत्याही रोगाबाबत भारत सरकारतर्फे माहिती मिळाल्यास, त्या भागातून अंडी व पोल्ट्रीची वाहतूक व प्रवेश बंद करण्यात येईल असे पशुसंवर्धन व पशुवैद्यकीय संचालनालयातर्फे कळविण्यात आले आहे.