प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेसाठी अर्ज करण्याने आवाहन

0
735

 

गोवा खबर:मत्स्योधोग संचालनालयाने प्रधानमंत्री मत्स्य संपदा या क्रेंद्र पुरस्कृत योजनेसाठी अर्ज मागविले असून इच्छुक अर्जदाराना, सर्वसामान्य गटासाठी ४० टक्के अनुदान, अनुसूचित जाती व जमाती आणि महिलांसाठी ६० टक्के अनुदान देतात. वैयक्तिक लाभधारकांसाठी ५ लाख रूपये खर्चाच्या एका युनिटमागे प्रति पिंजरा (केज या प्रमाणे अधिकाधिक पांच पिंजऱ्यासाठी  अनुदान मिळते.

त्याचप्रमाणे मत्स्य पालन शेतकरी गट, सहकारी संस्था किंवा समूह पध्दतिने मत्स्य पालन व्यवसाय करणाऱ्या सदस्यांच्या संख्येनुसार ५० पिंजऱ्यासाठी अनुदान मिळते.

 इच्छुक अर्जदारानी www.fisheries.goa.gov.in या खात्याच्या संकेतस्थळावर उपलब्ध असलेला अर्ज पूर्ण भरून त्याच्यासोबत संपूर्ण प्रकल्पाची माहिती १५ डिसेंबरपूर्वी सादर करावी. अधिक माहितीसाठी अर्जदारानी  मत्स्योधोग संचालनालयात, दयानंद बांदोडकर मार्ग पणजी येथे भेट द्यावी किंवा  (०८३२२२२४८३८/ २४२५२६३ / ९०७५१२९६९५ वर संपर्क साधावा किंवा dir-fish.goa@nic.in या संकेतस्थळावर भेट द्यावी,असे माहिती खात्यातर्फे कळविण्यात आले आहे.