प्रधानमंत्री फसल विमा योजना

0
843

गोवा खबर:मुंबई येथील मेसर्स फ्युचर जनरली इंडिया इन्सुरन्स कंपनी लिमिटेड या अंमलबजावणी एजन्सीव्दारे प्रधानमंत्री फसल विमा योजना ग्रामपंचायत पातळीवर राज्यात चालू असून खरीप पीक घेण्यासाठी उत्तर गोव्यात भात, डाळी, शेंगदाणे आणि ऊस आणि दक्षिण गोव्यात भात, डाळी आणि ऊस अशी पिके अधिसूचित केली आहे.

प्रधानमंत्री फसल विमा योजनेखाली सर्व शेतक-यांसाठी नोंदणी ऐच्छिक आहे. (कर्ज घेणारा आणि न घेणारा) तथापि कर्ज घेणा-या शेतक-यांस बाहेर पडण्याची तरतुद उपलब्ध आहे ज्यामध्ये कर्जदार शेतकरी २४ जुलैपूर्वी सदर योजनेतून बाहेर पडण्यासाठी संबंधित बॅंकेच्या शाखेत विहीत नमुन्यातील अर्ज सादर करू शकतात.

अधिक माहितीसाठी जवळच्या बॅकेत किंवा कृषी संचालनालय, विभागिय कृषी कार्यालय किंवा फ्युचर जनरली जनरल इन्शुरन्स कंपनीच्या कोणत्याही कार्यालयात ३१ जुलै पूर्वी संपर्क साधावा.