प्रजासत्ताक दिन सोहळ्याला लालकृष्ण अडवाणींची हजेरी

0
795
गोवा खबर:राज्यपाल मृदुला सिन्हा यांच्या हस्ते ध्वजारोहण करून गोव्यात 70 वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला.या सोहळ्याला विश्रांतीसाठी गोव्यात असलेले माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांनी आपल्या कन्येसह हजेरी लावली.

भाजप नेते अडवाणी सध्या दोनापावल येथील काबो राजभवनावर विश्रांती घेत आहेत.आज त्यांनी आपल्या कन्ये सोबत राजधानी पणजीत पार पडलेल्या प्रजासत्ताक दिन सोहळयाला हजेरी लावली.अडवाणी यांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रम स्थळी कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.अडवाणी यांनी सोहळा संपल्या नंतर राज्यपाल मृदुला सिन्हा यांच्या सोबत राजभवन गाठले. अडवाणी यांच्या उपस्थितीमुळे भाजप नेते उत्साहित झाल्याचे चित्र पहायला मिळाले.
आजारी असल्याने मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर कार्यक्रमाला उपस्थित राहू शकले नाहीत.राज्यपाल सिन्हा यांनी आपल्या भाषणात सरकारची भूमिका मांडली. केंद्रीय आयुष मंत्री श्रीपाद नाईक, सभापती प्रमोद सावंत आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.