प्रख्‍यात क्रिकेटर विरेंदर सेहवाग यांच्‍या हस्‍ते भारताचे क्रिकेटसाठी पहिले एक्‍स्‍पेरिएन्शियल लर्निंग अॅप ‘क्रिकुरू’ लाँच

0
383

 

  • विरेंदर सेहवाग आणि संजय बांगर यांनी संकल्‍पना मांडण्‍यासोबत विकसित केलेल्‍या अॅपचा क्रिकेटचे धडे अवगत करण्‍याच्‍या अनुभवामध्‍ये क्रांतिकारी बदल घडवून आणण्‍याचा मनसुबा
  • एआय आधारित अॅप अनोखे सानुकूल व वैयक्तिकृत प्रशिक्षण अनुभव देण्‍यासोबत खेळातील प्रख्‍यात खेळाडूंकडून तज्ञ सल्‍ला मिळण्‍याची सुविधा देईल
  • युजर्सना सुप्रसिद्ध खेळाडूंच्‍या स्‍वयं-अनुभवांमधून मानसिक फिटनेस व खंबीरपणाचे ज्ञान देखील मिळेल

 

 

गोवा खबर: भारताचे स्‍टार क्रिकेटर विरेंदर सेहवाग यांनी आज भारताचे पहिले एक्‍स्‍पेरिएन्शियल लर्निंग अॅप ‘क्रिकुरू’ लाँच केला आहे. या अॅपचा देशातील क्रिकेट प्रशिक्षण अनुभव पुनर्परिभाषित करण्‍याचा मनसुबा आहे.

देशातील एआय आधरित क्रिकेट प्रशिक्षणामध्‍ये अग्रस्‍थानी असलेल्‍या क्रिकुरूचा युजर्सना वैयक्तिकृत लर्निंग अनुभव देण्‍याचा मनसुबा आहे. प्रत्‍येक खेळाडूसाठी अभ्‍यासक्रम श्री. विरेंदर सेहवाग आणि माजी भारतीय खेळाडू व भारतीय क्रिकेट संघाचे फलंदाज प्रशिक्षक (२०१५-१९) श्री. संजय बांगर यांनी व्‍यक्तिश: विकसित केला आहे.

तंत्रज्ञान संचालित नवोन्‍मेष्‍काराच्‍या संदर्भात आंतरराष्‍ट्रीय क्रिकेट नव्‍या उंचीवर पोहोचत असताना भारत देखील देशातील महत्त्वाकांक्षी क्रिकेटर्सना अशाच प्रकारचा अनुभव देण्‍यासाठी यामध्‍ये सामील होण्‍याची गरज होती.

क्रिकुरूच्‍या लाँचबाबत आपले मत व्‍यक्‍त करत क्रिकुरूचे संस्‍थापक श्री. विरेंदर सेहवाग म्‍हणाले, ”क्रिकुरूमध्‍ये आमचा भारतातील क्रिकेट प्रशिक्षणाचे लोकशाहीकरण करण्‍यासाठी आणि सध्‍या असलेली पोकळी भरून काढण्‍यासाठी इकोप्रणाली विकसित करण्‍याचा मनसुबा आहे. आमचा अभ्‍यासक्रम अत्‍यंत बारकाईने डिझाइन करण्‍यात आला आहे. यामुळे जगभरातील तज्ञ प्रशिक्षकांना आंतरराष्‍ट्रीय दर्जाच्‍या क्रिकेटनुसार महत्त्वाकांक्षी क्रिकेटर्सना विनासायास प्रशिक्षण देता येईल.”

ते पुढे म्‍हणाले, ”क्रिकुरू पालकांना त्‍यांच्‍या मुलांचा सहयोगी बनण्‍याची देखील संधी देते, जेथे ही मुले क्रिकेटमधील व्‍यावसायिक करिअरसाठी आवश्‍यक कौशल्‍ये संपादित करण्‍याप्रती मेहनत घेत आहेत.”

क्रिकुरू हे भारताचे पहिले एआय सक्षम मोबाइल-वेब आधारित अॅप्‍लीकेशन जगभरातील ३० सर्वोत्तम प्रशिक्षकांच्‍या मास्‍टर क्‍लासेसच्‍या माध्‍यमातून तरूणांना क्रिकेट खेळण्‍याचे कौशल्‍य अवगत होण्‍यामध्‍ये मदत करण्‍यासाठी डिझाइन करण्‍यात आले आहे. यामध्‍ये प्रत्‍येक प्रशिक्षकाचा चार तासांचा व्हिडिओ कन्‍टेन्‍ट आहे, जेथे सानुकूल एआय संचालित तंत्रज्ञानाचा वापर करून प्रशिक्षणाचे मूल्‍यांकन करण्‍यात आले आहे. हे एकमेव एक्‍स्‍पेरिएन्शियल लर्निंग अॅप आहे, जे सर्वोत्तम व्हिडिओज, इंटरअॅक्टिव्‍ह ऑगमेण्‍टेड रिअॅलिटी आणि सर्वसमावेशक सिम्‍युलेशन्‍सच्‍या माध्‍यमातून प्रशिक्षण देते.

क्रिकुरूचे सह-संस्‍थापक श्री. संजय बांगर म्‍हणाले, ”देशभरात द्वितीय आणि तृतीय श्रेणीच्‍या शहरांसह कानाकोप-यामधील लोकांना क्रिकेट प्रशिक्षण उपलब्‍ध करून देणे हा क्रिकुरूचा दृष्टिकोन आहे. या अॅपमुळे त्‍यांना त्‍यांच्‍या घरामधूनच आरामशीरपणे प्रशिक्षण मिळू शकते. स्‍मार्टफोन व इंटरनेटचा वापर वाढत असताना ही सुविधा महत्त्वाकांक्षी क्रिकेटर्ससाठी अधिक सुलभपणे उपलब्‍ध होईल.”

क्रिकुरू हे प्रात्‍यक्षिक व मुलाखतींचे संयोजन आहे, जेथे तुमचा क्रिकुरू तुम्‍हाला त्‍याचा अनुभव सांगण्‍यासोबत प्रशिक्षण देतो. प्रत्‍येक क्‍लासमध्‍ये व्‍यापक प्री-रेकॉर्ड केलेले व्हिडिओ कन्‍टेन्‍ट आहेत आणि हे व्हिडिओज थांबवता येऊ शकतात, पुढे करता येऊ शकतात आणि वारंवार पाहता येऊ शकतात. हा अॅप आयओएस व अँड्रॉईड डिवाईसेसवर उपलब्‍ध आहे आणि युजर्स www.cricuru.com येथे लॉग ऑन करून १ वर्षासाठी अॅप सबस्‍क्राईब करू शकतात. स‍बस्क्रिप्‍शन फी १ वर्षाच्‍या कालावधीसाठी २९९ रूपयांपासून सुरू होते.

क्रिकुरूची ठळक वैशिष्‍ट्ये
जगभरातून ३४ सर्वोत्तम खेळाडू प्रशिक्षकांची निवड जसे एबी डीव्हिलियर्स, ब्रेट ली, ब्रायन लारा, ख्रिस गेल, ड्वेन ब्रावो, हरभजन सिंग, जॉण्‍टी -होड्स इत्‍यादी
युजर्सच्‍या फलंदाजीचे वस्‍तुनिष्‍ठपणे मूल्‍यांकन करण्‍यासाठी आणि त्‍याची प्रगती दाखवण्‍याकरिता घेत असलेल्‍या मेहनतीच्‍या आधारावर कामगिरीचे रेटिंग करण्‍यासाठी सानुकूल एआय संचालित तंत्रज्ञान
प्रत्‍येक युजरला एमसीसी प्रशिक्षण मॅन्‍युअलअंतर्गत स्‍कोअर मिळतो
प्रत्‍येक युजरला वैयक्तिकृत प्रशिक्षण अनुभव
माहितीपूर्ण उपक्रम, जो काही सुप्रसिद्ध क्रिकेट लीजेण्‍ड्सकडून संचालित
युजर्सना सुप्रसिद्ध खेळाडूंना मिळालेले यश, त्‍यांचा अयशस्‍वी काळ आणि मिळालेल्‍या प्रतिष्‍ठेबाबत प्रत्‍यक्ष अनुभव

 

क्रिकुरू बाबत

क्रिकुरू हे मोबाइल-वेब आधारित अॅप्‍लीकेशन आहे. या अॅपमध्‍ये प्रशिक्षण व्हिडिओज, एआय/एमएल विश्‍लेषण आणि डायल-ए-कोच सारखी प्रमुख वैशिष्‍ट्ये आहेत. तसेच या अॅपमध्‍ये दिग्‍गज क्रिकेटर्सच्‍या व्हिडिओवर आधारित खेळाचे प्रशिक्षण देणारे एआय/एमएल आहे, ज्‍यामधून महत्त्वाकांक्षी क्रिकेटर्सना तज्ञ क्रिकेट प्रशिक्षण व्‍यासपीठ उपलब्‍ध होतो. दिग्‍गज क्रिकेटर विरेंदर सेहवाग आणि क्रिकेटर व प्रशिक्षक संजय बांगर यांनी क्रिकुरूची स्‍थापना केली आहे. तुम्‍हाला क्रिकेटचे योग्‍य ज्ञान मिळण्‍यामध्‍ये मदत करण्‍यासाठी जगभरातील काही सर्वोत्तम क्रिकेटर्सकडून माहिती व अनुभव देण्‍याचा या अॅपचा मनसुबा आहे.