प्रख्यात फॅशन डिझायनर वेंडेल रॉड्रिग्स यांचे निधन

0
815
गोवा खबर:आंतरराष्ट्रीय ख्यातीचे प्रख्यात फॅशन डिझायनर पद्मश्री वेंडल रॉड्रिग्स यांचे आज उत्तर गोव्यातील कोलवाळे येथील त्यांच्या राहत्या घरी सायंकाळी निधन झाले.ते 59 वर्षांचे होते.

वेंडल रॉड्रिग्स यांनी फॅशन डिझायनर म्हणून आंतरराष्ट्रीय पातळीवर आपली छाप सोडली होती.फॅशन डिझायनिंग मधील त्यांच्या योगदानाची दखल घेऊन सरकारने 2014 मध्ये त्यांना पद्मश्री पुरस्कार देऊन सन्मानित केले होते.
रॉड्रिग्स यांच्या निधनाच्या वृत्ताने आपल्यास अतीव दुःख झाल्याचे सांगत मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी शोक व्यक्त केला आहे.आरोग्यमंत्री विश्वजीत राणे आणि विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी ट्वीट करत शोक व्यक्त केला आहे.