प्रक्षोभक वक्तव्य प्रकरणी रामकृष्ण जल्मींना अटक

0
497
 गोवा खबर:बाणावली येथील सीएए विरोधी सभेत प्रक्षोभक वक्तव्य केल्याप्रकरणी क्राइम ब्रांचने सीएए विरोधी कार्यकर्ते रामकृष्ण जल्मी यांना अटक केली आहे.काल आणि आज जल्मी यांच्या विरोधात राज्यभरातील अनेक पोलिस स्थानकांमध्ये तक्रारी करून त्यांच्यावर कारवाईची मागणी करण्यात आली होती.
बाणावली येथे २९ फेब्रुवारीला सीएए कायद्याच्या विरोधात ‘पीपल्स फोरम फॉर जस्टीस, सेक्युलॅरिझम् आणि डेमॉक्रेसी’ या संघटनेच्या सभेत रामकृष्ण जल्मी यांनी आपल्या भाषणात भगवान परशुराम यांच्याविषयी अवमानकारक वक्तव्य केल्याचा दावा करत त्यांच्या विरोधात राज्यभरातून विविध पोलिस स्थानकांमध्ये तक्रारी दाखल होऊ लागल्या आहेत.
स्थानिका प्रूडंट या वृत्तवाहिनीवर या सभेची बातमी दाखवल्या नंतर जल्मी यांच्या विरोधात तक्रारी दाखल होऊ लागल्या आहे.
मडगाव येथील पत्रकार गौरांग प्रभू मळकर्णेकर यांनी ही सभा ज्या पोलिस स्थानक क्षेत्रात झाली त्या कोलवा पोलिस स्थानकात तक्रार दाखल केली आहे.त्याशिवाय हिंदू युवा सेनेने म्हापसा पोलिस स्थानकात तर फोंडा पोलिस स्थानकात हिंदू जन जागृती समिती आणि इतर हिंदुत्ववादी संघटनांनी जल्मी यांच्या विरोधात तक्रारी नोंदवल्या आहेत.
 हिंदू जनजागृती समितीने प्रसिद्धिस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे,प्रूडेंट वाहिनीवरील बातमीत जल्मी यांची वक्तव्ये दाखवण्यात आली. ही वक्तव्ये पाहून गोव्यातील हिंदूंकडून तीव्र संताप व्यक्त होत आहे.यविरोधात काही धर्माभिमानी हिंदूंनी या विरोधात मोठे आंदोलन उभारण्याचे ठरवले आहे.
 फोंडा येथील पोलीस स्थानकात हिंदुत्ववादी संघटनांनी रामकृष्ण जल्मी यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. जल्मी यांच्या विरोधात कलम २९५ ए आणि १५३ ए अंतर्गत कारवाई करावी,अशी मागणी यात करण्यात आली आहे.
रामकृष्ण जल्मी यांनी भगवान परशुराम यांच्याविषयी अत्यंत अवमानकारक वक्तव्ये केली आहेत. निवेदनात जल्मी यांनी केलेली वक्तव्ये देण्यात आली आहेत.
तक्रारीत म्हटले आहे की, आमची भगवान परशुराम यांच्यावर नितांत श्रद्धा आहे.ते श्रीविष्णूचे ६ वे अवतार आहेत. त्यांनी बाण मारून ही भूमी निर्माण केली यावर हिंदूंची ठाम श्रद्धा आहे.मात्र रामकृष्ण जल्मी यांनी त्यांची टिंगल उडवली आहे. त्यांच्याविषयीची वक्तव्ये ऐकून आमच्या धर्मभावना दुखावल्या असून त्यांच्यावर कायद्यानुसार कारवाई करावी, तसेच यापुढे कोणत्याही सभेत भाषण करण्यापासून त्यांना प्रतिबंध करावा,अशी मागणी करण्यात आली आहे.