पोस्ट ऑफीस पासपोर्ट सेवा केंद्राचे मडगाव येथे उद्या उदघाटन

0
778

गोवा खबर:मडगाव येथे पोस्ट ऑफीस पासपोर्ट सेवा केंद्राचे उदघाटन 14 फेब्रुवारी रोजी करण्यात येणार आहे. दक्षिण गोव्याचे खासदार श्री नरेंद्र सावईकर आणि नगरनियोजन आणि कृषीमंत्री विजय सरदेसाई यांच्या उपस्थितीत मडगाव येथील पासपोर्ट सेवा केंद्राचे उदघाटन करण्यात येणार आहे. केंद्रीय परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने टाटा कन्सलटन्सी सर्विसेसच्या सहकार्याने सार्वजनिक खासगी भागीदारीच्या माध्यमातून पासपोर्ट सेवा प्रकल्प सुरु केले आहेत.

नागरिकांना पासपोर्ट सेवा व्यापक प्रमाणावर मिळावी या उद्देशाने केंद्रीय परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने टपाल विभागाच्या सहकार्याने पासपोर्टसंबंधी सेवा देण्याचा निर्णय घेतला आहे. अर्जदाराने ऑनलाईन अर्ज केल्यानंतर त्याला आता इच्छित पासपोर्ट सेवा केंद्र निवडून मुलाखत निर्धारीत करता येईल. तसेच माहिती-तंत्रज्ञानाच्या माध्यमातून पोस्ट ऑफीस पासपोर्ट सेवा केंद्राच्या माध्यमातून पारपत्र अर्जदारांपर्यंत पोहचवता येईल. यामुळे नागरिकांना निर्धारीत वेळेत, पारदर्शी पद्धतीने आणि खात्रीशीर सेवा मिळेल.