पोस्टर्स कारद्वारे श्रीदेवीला श्रद्धांजली

0
944

गोवा मनोरंजन संस्थेतर्फे मॅकेनिज पॅलेसमध्ये आज पासून 7 जून पर्यंत आयोजित राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त चित्रपट महोत्सवाच्या निमित्ताने दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी चाहत्यांनी श्रीदेवीच्या विविध गाजलेल्या चित्रपटांच्या पोस्टर्सने सजवण्यात आलेली ही कार मॅकेनिज पॅलेस परिसरात ठेवली जाणार आहे.

पुणे येथील परीधी भाटी, भावना वर्मा, टोनू सोजातीया यांनी  सजवलेली ही कार मनोरंजन संस्थेच्या आवारात ठेवण्यात आली आहे. श्रीदेवी यांच्या चित्रपटसृष्टीतील कारकिर्दीचा प्रवास या कारवर पोस्टर्सद्वारे दाखवण्यात आला आहे.

हि कार लोकांचे लक्ष वेधून घेत असून अभिनेत्री श्रीदेवी यांच्यावर असलेल्या प्रेमापोटी त्यांच्या चाहत्यांनी ही कार सजवली आहे. या कारवर श्रीदेवीच्या विविध भावमुद्राही  दाखविण्यात आल्या आहेत. श्रीदेवी यांनी वयाच्या तिसर्‍या वर्षापासून केलेला अभियन ते ‘मॉम’ या त्यांच्या  शेवटच्या चित्रपटापर्यंतचे काही संवादही या कारवर लिहिण्यात आले आहेत.

श्रीदेवींच्या काही प्रसिद्ध हिंदी आणि दक्षिण भारतीय भाषांमधील चित्रपटांच्या पोस्टर्ससोबत ‘लम्हे’ आणि ‘चांदनी’ चित्रपटाची छायाचित्रेही त्यात आहेत.