पोलीस हुतात्म्यांचे स्मरण

0
180

 

 

          दरवर्षी २१ ऑक्टोबरला जम्मू-कश्मीरमधील हॉट स्प्रिंग्ज (लडाख) येथे आपल्या मातृभूमीच्या अखंडतेचे रक्षण करताना  प्राण गमावणार्‍या दहा पोलीस कर्मचार्‍यांनी दिलेल्या बलिदानाचे स्मरण करण्यात येते. अक्साई चिनमध्ये भारतीय भूभागाचे उल्लंघन करणार्‍या चिनी सैन्य दलाने घातलेल्या वेढ्यात हे पोलीस मारले गेले होते.

१९५९ च्या मध्यापासून, सीमेवरील सैनिक चिनी सैन्याच्या उल्लंघनामुळे अचानक सक्रीय झाले. तथापी, २१ ऑक्टोबर रोजी डीसीआयओच्या करमसिंह यांच्या नेतृत्वाखालील पोलिस पथकावर स्वयंचलित शस्त्रांनी सुसज्ज असलेल्या चीनी सैन्याने हल्ला केला. केवळ रायफल्सने सशस्त्र असलेल्या भारतीय पोलिसांनी शत्रूंच्या शक्तीवर नियंत्रण मिळविण्यापर्यंत झुंज लढवली ज्यात १० जणांचा मृत्यू आणि ९ जणांना पकडण्यात आले.

भारतीय हद्दीतील चीनी सैन्यदलाबरोबर झालेल्या असमान चकमकीत या पोलीसांच्या शहशतीबद्दल संपूर्ण भारत देशाने शोक व्यक्त केला. चीनी लोकांनी १३ नोव्हेबरला मृतदेह ताब्यात दिले आणि दुसर्‍या दिवशी सकाळी ८ वाजता हॉट स्प्रिंग्ज (लडाख) येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या शूर सैनिकांच्या बलिदानाबद्दल शोक व्यक्त करण्यासाठी देशातील प्रत्येक पोलिस जिल्हा मुख्यालयात पोलीस दल समारंभपूर्वक परेडसाठी जमतात.

आपले कर्तव्य बजाविताना हुतात्मा पत्करलेल्यांच्या स्मरणार्थ २१ ऑक्टोबर हा दिवस पोलीस स्मरण दिवस म्हणून पाळण्यात येतो.

गोवा पोलिसही  लोकांची नि:स्वार्थिपणे व न चुकता सेवा करीत आहेत  आणि त्यांना ज्यांनी आपल्या प्रशिक्षणा दरम्यान घेतलेली शपथ पाळण्यासाठी आपले प्राण गमावले अशा शहिदांबद्दल अभिमान आहे. विशेष म्हणजे पोलिस स्मृतिदिनानिमित्त कर्तव्य बजाविताना आपले प्राण अर्पण करणार्‍या स्व. हेड कॉन्स्टेबर श्री. बलराम बी शिंदे आणि दिवंगत पोलिस उपनिरीक्षक श्री. अभिषेक शेर अली परवेज गोम्स या आमच्या विरांना ही खरी श्रध्दांजली ठरेल. त्यांचा अल्प परिचय पुढीलप्रमाणे:-

स्व.. श्री. बलराम बी. शिंदे

स्व. बलराम शिंदे, (हेड कॉन्स्टेबल) प्रामाणिक आणि समर्पित पोलिस होते. त्यांचा जन्म महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यातील सारवली या छोट्या गावात झाला. 1969 मध्ये एसएससी उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांची गोवा पोलिसात पोलिस कॉन्स्टेबल पदासाठी निवड झाली. त्यांच्या कर्तव्याप्रती असलेल्या समर्पण आणि निष्ठेमुळे श्री. शिंदे वरिष्ठांचे आवडीचे होते आणि त्यांच्या प्रामाणिकपणा आणि परिश्रमुळे त्यांना पुरस्कार प्राप्त झाला आहे. 1985 मध्ये हेड कॉन्स्टेबल म्हणून त्यांची पदोन्नती झाली. श्री. शिंदे यांनी गोव्यातील सर्व महत्त्वाच्या पोलिस स्थानकांमध्ये काम केले होते.

1999 मध्ये, सांखवाळ येथील आगामी मेटा स्ट्रिप्स फॅक्टरीविरूद्ध आजूबाजूच्या गावातील काही स्थानिक लोकांच्या आंदोलनादरम्यान श्री. शिंदे पोलिस आउट-पोस्ट, कुठ्ठाळी येथे तैनात होते.  त्यांना स्थानिकांवर विश्वास होता आणि त्यांना हाताळण्यासाठी ते सक्षम होते.

तथापि, 4 मार्च 2000 रोजी, संद्याकाळी सुमारे 4 वाजता श्री. शिंदे कुठ्ठाळी आऊट-पोस्टवर ड्यूटीवर होते, तेव्हा एका भीषण जमावाने त्यांना घेरले आणि त्यांच्या काही सहकार्‍यांना एका खोलीत बंद केले.  श्री. शिंदे यांनी जमावाला प्रतिकार केला आणि जमावाला समजावण्याचा व त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न केला.  त्याच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला आणि त्यांना जीवघेणी दुखापत करण्यात आली ज्यामुळे ते बेशुद्ध झाले.  परिसरातील काही हितचिंतकांनी त्यांना मदत केली आणि रस्ता मोकळा करत असलेल्या वरिष्ठ अधिकार्‍यांना सांगितले. बांबोळीतील इस्पितळात त्यांना ठेवण्यात आले, ते कोमामध्ये होते शेवटी 23 एप्रिल रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

 

स्व. श्री. अभिषेक शेर-अली परवेझ गोम्स

स्व. पीएसआय श्री. अभिषेक शेर-अली परवेज गोम्स, हे मडगांव येथील रहिवासी असून ते थेट उरपनिरीक्षक म्हणून दिनांक ७ सप्टेबर २००६ रोजी पोलिस विभागात सामील झाले होते.

१६ मार्च २०१३ रोजी ते पोलिस कॉन्स्टेबल श्री. मारुती धुपवाडकर यांच्या सोबत फोंडा येथे रहदारी ड्युटीवर होते. आमीगोस जंक्शन, कूर्टी-फोंडा येथे ७.३०च्या सुमारास त्यांना वेगाने चाललेला ट्रक दिसला आणि त्यांनी ट्रक थांबविण्याचा संकेत दिला.ट्रकचालकाने सिग्नल मोडला व थांबला नाही आणि पीएसआयला जवळजवळ ठोठावत बोरीच्या दिशेने ट्रक पळवत सुटला. कायदा मोडल्याने ट्रकला पकडण्यासाठी पीएसआयने त्वरीत त्याच्या अधिकृत मोटरसायकलनिशी ट्रकचा पाठलाग केला.

ते ट्रकाचा पाठलाग करत होते तथापी ट्रक ड्राईवर थांबला नाही आणि त्यांना अडथळा करून ड्राईव्हर जलद गतीने गेला व मोटरसायकलला आपटला आणि पीएसआय गोम्सची मोटरसायकल २० मीटर अंतरापर्यंत फरफटत गेली त्यांत ते गंभीररीत्या जखमी झाले त्यांना लगेच फोंड्यातील आयडी इस्पितळात दाखल करण्यात आहे आणि त्यानंतर बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालयात हलविण्यात आले. उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला. आपले कर्तव्य बजावीत असताना ट्रक ड्राईव्हरने मुद्दामहून त्यांना धडक दिली आणि त्यात ते गतप्राण झाले.

२१ ऑक्टोबर रोजी पाळण्यात येणार्‍या पोलीस स्मरण दिनी स्वर्गीय अभिषेक शेर-अली पर्वेज गोम्स यांना आदरांजली वाहिण्यात येईल.

पोलिस स्मृतिदिनानिमित्त, मी गोवा राज्यातील सर्व नागरिकांना डिसेंबर २०१५ मध्ये माननीय पंतप्रधानांनी सुरू केलेल्या कर्तव्यादरम्यान पोलिस कर्मचार्‍यांनी केलेल्या सर्वाच्च त्यागांना उजाळा देण्यासाठी (www.Police.gov.in) या राष्ट्राच्या सेवेसाठी असलेल्या भारतीय पोलिसांच्या वेबसाईटला भेट देण्याचे आवाहन करीत आहे.

– मुकेश कुमार मिणा, आयपीएस, डीजीपी गोवा