पोलिस महासंचालक नंदा यांचे दिल्लीत कार्डियाक अटॅकने निधन

0
589
 गोवा खबर:गोव्याचे पोलीस महासंचालक प्रणब नंदा यांचे कार्डियाक अटॅकमुळे शनिवारी मध्यरात्री दिल्ली येथे निधन झाले. राज्याचे पोलीस महानिरीक्षक जसपाल सिंग यांनी सदर वृत्ताला दुजोरा दिला आहे.

पोलिस महानिरीक्षक जसपाल सिंग म्हणाले, शनिवारी मध्यरात्री १ वाजण्याच्या सुमारास नंदा यांच्या निधनाचे वृत्त त्यांच्या पत्नी आयपीएस सुंदरी नंदा यांच्याकडून कळाले. आमच्यासाठी ही अत्यंत अविश्वसनीय बातमी होती. नंदा हे महत्त्वाच्या बैठका संपवून दिल्ली येथे गेले होते. त्या दरम्यान त्यांना आलेल्या कार्डियाक अटॅकमध्ये त्यांचे निधन झाले.

 दिल्लीला निघण्यापूर्वी राज्यात त्यांनी दोन महत्त्वाच्या बैठका घेतल्या. त्यातील एक गुन्हे विभागासंदर्भात होती, त्याला राज्याचे मुख्य सचिव उपस्थित होते. तर दुसरी बैठक राज्यातील पोलिसांना देण्यात येणाऱ्या शौर्यपदका संदर्भात होती. बैठकीनंतर ते दिल्लीला पोहोचले. मात्र मध्यरात्री सदर धक्कादायक वृत्त आले, यावर आम्ही अजून विश्वास ठेवू शकत नाही, अशा शब्दात पोलिस महानिरीक्षक सिंग यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
पोलिस महासंचालक म्हणून प्रणब नंदा फेब्रुवारी मध्ये गोव्यात रुजू झाले होते.