पोलिस निरीक्षक एकोस्करांना निलंबित करा; शिवसेनेची डीजीपींकडे मागणी

0
1531

गोवा खबर:सांगेचे पोलिस निरीक्षक सागर एकोस्करांनी कायदा हातात घेऊन सर्वसामान्य लोकांना त्रास दिलेला असल्याने त्यांच्यावर फक्त बदलीची कारवाई न करता त्यांना निलंबीत करून त्यांची चौकशी केली जावी अशी मागणी आज गोवा प्रदेश शिवसेनेच्या वतीने करण्यात आली.पोलिस महासंचालक मुक्तेश चंदर यांनी दक्षिण गोवा पोलिस अधीक्षकांना फोन वरुन निर्देश देत एकोस्करांच्या विरोधात आलेल्या तक्रारींची चौकशी करण्यास सांगितले.यावेळी सांगे पोलिस स्थानकातील सीसीटीव्ही लवकरात लवकर सुरु करून तेथील गैरप्रकारांवर आळा घाला अशी मागणी नाईक यांनी केली.
पंच सदस्य जानू झोरे यांना सांगे  पोलिस स्थानकात एकोस्कर यांनी केलेल्या मारहाणीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उपाध्यक्ष राखी नाईक यांनी काल पत्रकार परिषद घेऊन एकोस्करांना त्वरित निलंबीत करावे अशी मागणी केली होती.आज शिवसेना राज्यप्रमुख जितेश कामत यांच्या यांच्या नेतृत्वाखाली उपाध्यक्ष राखी नाईक,सरचिटणीस मिलिंद गावस,राज्य सचिव वंदना लोबो,उत्तर गोवा जिल्हा प्रमुख किशोर राव आदी यावेळी उपस्थित होते.
शिष्टमंडळाने भाजपच्या बाइक रॅली मध्ये हेल्मेट शिवाय सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांवर कारवाई करावी अशी मागणी डीजीपींकडे केली.