पोटपुजा’च्या लेखिका उषा बाळे यांचे निधन

0
919

 

आपल्या पहिल्याच पुस्तकातून गोव्याच्या सर्व पुस्तकांचे विक्रम मोडणाऱ्या लेखिका उषा वामन बाळे यांचे शनिवारी प्रदीर्घ आजारानंतर दुःखद निधन झाले. त्या 65 वर्षांच्या होत्या.

गोमंतकीय पारंपारिक पाककृतीवरील ‘पोटपुजा’ या त्यांच्या कोंकणी पुस्तकाची प्रथम आवृत्ती 15 जानेवारी 2015 रोजी प्रकाशित होण्यापूर्वीच अर्ध्याहून जास्त प्रती प्रकाशनपूर्व बुकिंगमध्ये खपल्या होत्या. त्यामुळे अवध्या 18 दिवसांत या पुस्तकाची दुसरी आवृत्ती प्रकाशित करावी लागली होती.

तदनंतर पाच महिन्यात तिसरी आवृत्ती प्रकाशित झाली होती तर आता चौथी आवृत्तीही संपत आलेली आहे.

ब्रेकफास्ट व जेवणाचे अभिनव वेळापत्रक व समतोल आहारासाठी लागणाऱ्या पौष्टिकांचा समावेश असलेल्या या पुस्तकाची इंग्रजी आवृती जानेवारी 2016 मध्ये प्रकाशित झालेली असून मराठी आवृत्तीही प्रकाशित होण्याच्या मार्गावर आहे.

त्यानंतर गणेश चतुर्थीपूर्वी त्यांचे ‘सणां-खाणां’ हे सणासुदीच्या पाककृतींवरील नवीन कोंकणी पुस्तक हल्लीच प्रकाशित झालेले आहे.

श्रीमती बाळे यांच्यामागे त्यांचे पती वामन बाळे व दोन स्नुषा गौरी तेलंग व दिप्ती प्रभू माळयार व नातवंडे असा परिवार आहे.

त्यांची अंत्ययात्रा रविवारी सकाळी 11.30 वाजता केपे तालुक्यातील आंबावलीच्या त्यांच्या निवासस्थानाहून निघेल.